Veterinary Science Course : पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम पुढील दोन वर्षे सुरु राहणार

Veterinary Diplome course : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry and Dairy Development : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका ( diploma in livestock management and dairy production)अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने घेतला होता. पण या निर्णयाला लोकप्रतिनिधी व पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आक्षेप घेतल्याने हा निर्णय मागे घेत हा पदविका अभ्यासक्रम पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

दरम्यान, पशुसंवर्धन विषय तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.

Dairy Business
Animal Science Diploma : आता पशुविज्ञान पदविका अभ्यासक्रम बारावीनंतर

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. शरद गडाख, अतिरिक्त पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. शितलकुमार मुकणे आदी उपस्थित होते.

Dairy Business
Agriculture Education : 'पशुसंवर्धन' पदविका अभ्यासक्रमाचे स्वागत, पण...

या बैठकीत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका सुरुच ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. त्यास सकारात्मकता दाखवत विखे-पाटील यांनी हा अभ्यासक्रम सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे. पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करता पुढील दोन वर्षे सुरु ठेवण्यात येईल. पुढील दोन वर्षानंतर या अभ्यासक्रमाचा 'पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम' यामध्ये समावेश करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्यात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापिठाअंतर्गत इयत्ता बारावी नंतर विज्ञान शाखेमध्ये जीवशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहे. विद्यापिठाने इयता १२ वी नंतर या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, प्रयोगशाळा आदी तपासणी करावी, असे निर्देश दिले.

कुलगुरु डॉ. शंकर गडाख म्हणाले, विद्यापीठ स्तरावरुन गठीत करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. यामुळे दर्जेदार, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com