Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Panchganga Sakhar Karkhana : सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय वाचन करताना 'मंजूर', 'मंजूर' घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंड आणल्याचा आरोप करण्यात आला.
Panchganga Sugar Factory
Panchganga Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यात गाळपात अग्रेसर असणाऱ्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची ६८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा गदारोळात पार पडली. सभा शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याने सभेला गालबोट लागले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, त्यानंतर एकमेकांची देणी काढण्यावरून कार्यकर्त्यांत हमरीतुमरी झाली. काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनाताई मगदूम यांनी सत्ताधारी गटावर जोरदार विरोध केला.

सत्ताधाऱ्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करीत असून, सत्ताधाऱ्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय वाचन करताना 'मंजूर', 'मंजूर' घोषणा देण्यासाठी भाडोत्री गुंड आणले होते. मंजुरची घोषणा देणारा एकही सभासद नव्हता. सभेतील वाचन केलेले सर्व विषय नामंजूर आहेत. अध्यक्ष सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता 'ऐ तू खाली बस' असे ज्येष्ठ सभासदांना धमकावत होते, असा आरोप माजी अध्यक्ष रजनीताई मगदूम यांनी केला. सभा झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावर साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी सभेला संबोधित केले यावेळी ते म्हणाले की, विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत कारखान्याला बदनाम करू नये. शंका असतील त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी. सर्वांना उत्तर देण्याची तयारी असल्याचे पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी सांगितले.

अध्यक्ष पाटील म्हणाले, आण्णांनी सूतगिरणीची स्थापना केली. त्यातून सभासदांना ऊर्जितावस्था देण्याचे प्रयत्न केले. कारखाना १४ वर्षापूर्वी रेणुका शुगर्सला चालविण्यासाठी दिल्यानंतर अंतर्गत सर्व मशिनरी बदलली. त्यावेळी पाच हजारांची क्षमता असलेला कारखाना २५०० क्षमतेने वाढविला आणि ७५०० क्षमता केली. तेही कमी कामगारांच्या संख्येवर. फक्त आता कारखान्याची इमारत जुनी आहे. भविष्यात त्याचीही व्यवस्था केली जाईल.

कारखाना चालवायला देताना कारखान्याने एकही रुपयाची गुंतवणूक केली नाही. एकूण देणी १०७ कोटी देणे बाकी पूर्ण केल्यानंतर वाढीव देणीसाठी काही स्वरूपात मुदतवाढ दिली जाईल. डिस्टिलरी टेंडर पद्धतीने भाड्याने दिली आहे. नाबार्डच्या छानणीनंतर त्यांचे पत्र घेऊन जमीन विक्रीचे टेंडर अधिक रकमेच्या विक्रीतून दिले आहे. पंचगंगेला नेहमीच अर्थसहाय्य करणाऱ्या मंडळीकडून अर्थसहाय्य घेऊन कारखाना उभारला असल्याचे मत अध्यक्ष पीएम पाटील यांनी व्यक्त केले.

Panchganga Sugar Factory
Kolhapur Collector : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांप्रश्नी जिल्हाधिकारी आक्रमक, प्रादेशिक साखर सहसंचालकांना निर्देश

मगदूम म्हणाल्या, 'सर्वसाधारण सभेत सहकार संपत असल्याचे दिसले. कारखान्यात गुंडगिरी व फसवेगिरी वाढली आहे. स्वर्गीय अण्णांनी सभासद व कामगारांना मालक समजून कामकाज केले. पण, सध्या कारखान्यात मनमानी, झुंडशाही सुरू आहे. कारखान्याला सभासदांचा ऊस घेतला जात नाही. बाहेरच्या लोकांचा ऊस आणला जातो. कामगारांना पगार व तोडणी वाहतुकीची देणी देण्यासाठी माझी स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवून लक्ष्मी ऑरगॅनिककडून पैसे आणले होते. कारखाना वाचविण्यासाठी लढा सुरू राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com