Kolhapur Collector : गडहिंग्लज साखर कारखान्याच्या कामगारांप्रश्नी जिल्हाधिकारी आक्रमक, प्रादेशिक साखर सहसंचालकांना निर्देश

Collector Amol Yedage : जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी येडगे होते.
Godsakhar Sugar Factory
Godsakhar Sugar Factory agrowon
Published on
Updated on

Gadhinglaj Cooperative Sugar Factory : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याच्या ३०० निवृत्त कर्मचाऱ्यांचे देणे असणारे सुमारे ५८ कोटी रुपये ‘ब्रिक्स’ कंपनीकडून मिळावेत, निवृत्त कर्मचाऱ्यांना चरितार्थासाठी महिन्याला १० हजार रुपये, पाच लाख रुपये एकरकमी द्यावेत, अशा विविध मागण्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी काल(ता.१३) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर मांडल्या. यावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांची सखोल माहिती घ्यावी, तसेच कारखान्याच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना घेऊनच पुढील बैठकीला यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कारखान्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी येडगे होते. गडहिंग्लज साखर कारखाना निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, आदी उपस्थित होते.

खोत यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न मांडले. औद्योगिक न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यातील वकील कारखान्याने रद्द करावा, ‘ब्रिक्स’विरोधातील कारखान्याच्या दाव्यातील वकील फी कारखान्याने द्यावी, प्रशासकीय काळामध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केलेले ठराव माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर झालेत, ते पुन्हा मंजूर करावेत.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याचे कामगार अधिकारी गणपत पाटील यांना विचारणा केली. त्यावर पाटील यांनी मला कोणतेही अधिकार नाहीत व बैठकीसाठी मला अचानक पाठविले आहे. त्यामुळे तुम्ही अध्यक्ष व उपाध्यक्षांना बोलावून घ्या, असे सांगिले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही आम्हाला शिकवू नका, तुम्हाला जर अधिकारच नाहीत तर तुम्ही आलाच कशाला?, अशा शब्दांत पाटील यांना फटकारले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील बैठकीवेळी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांची सखोल माहिती घेऊन या. तसेच येताना कारखान्याच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना घेऊन या, असे निर्देश प्रादेशिक सहसंचालकांना दिले.

आप्पासाहेब लोंढे, रणजित देसाई, सुभाष पाटील, महादेव मांगले, सदाशिव कांबळे, अशोक कांबळे, श्रीकांत रेंदाळे, सुरेश पाटील, दिनकर खोराटे, अरुण लोंढे, गणपत वांद्रे, अनंत देवार्डे, संभाजी बुगडे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com