Panchganga River : पंचगंगा तिसऱ्यांदा कोरडी, धरणातून पाणी सोडले तरी नागरिकांना पाणी टंचाई

Panchganga River Dry : इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागाचा विचार करता शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Panchganga River
Panchganga Riveragrowon
Published on
Updated on

Kolhapur Panchaganga River : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीपात्राने यावेळी तीनवेळा तळ गाठला आहे. जो भाग सखल आहे त्यामध्ये पाणी आहे परंतु उंच भाग पूर्णपणे कोरडा पडल्याने इचलकरंजी परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरम्यान प्रशासनाने ठेवलेल्या समन्वयाने पंचगंगा नदीला वेळोवेळी धरणातून पाणी सोडले जात आहे.

इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागाचा विचार करता शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी असल्याने खबरदारी म्हणून पाणी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच पाणी उपसा करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे तूर्त नागरिकांना पाणीटंचाईला समोरे जावे लागणार आहे.

यंदा पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासूनच जाणवत आहे. कूपनलिकांचे पाणी कमी होत चालले आहे. काही ठिकाणी कूपनलिका कोरड्या पडत आहेत. तर नदीपात्रातील पाणी सतत कमी होत आहे. यावर्षी तिसऱ्यांदा पंचगंगा नदीपात्रातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे इचलकरंजीला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.

चार दिवसांपूर्वी पाण्याला काळपट रंग आल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा बंद केला होता. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. केवळ कृष्णा योजनेतून शहरातील पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Panchganga River
Drought in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ भीषणता! ११७ गावे व १२८ वाड्यांना पाणीपुरवठ्याची व्यवस्था

सुदैवाने धरणातून पुन्हा पाणी सोडले आहे. दोन दिवसांत नदी प्रवाहित होणार आहे. तूर्त तरी घाट परिसर उघड्यावर पडला आहे. पुरेसे पाणी आल्यानंतर त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. ऑक्सिजनचे प्रमाण योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर उपसा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप तरी पंचगंगा नदीतून पाणी उपसा सुरू होण्यास तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे.

जलपर्णी रोखण्याची जाळी तुटली

नदीपात्रात पश्चिम दिशेकडून पाण्याच्या प्रवाहासोबत येणारी जलपर्णी रोखण्यासाठी कट्टीमोळा येथे महापालिकेने लोखंडी - तारेची जाळी बसवली होती. तेथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली होती. मात्र, त्याचा दबाव वाढत गेल्यामुळे ही जाळी तुटली असून प्रवाहासोबत जलपर्णी इचलकरंजीच्या दिशेने येत आहे. ही जाळी पुन्हा - बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com