Mango Festival : ‘पणन’चा आंबा महोत्सव सोमवारपासून होणार सुरू

Mango Season : या वर्षीचा आंबा महोत्सव राज्य कृषी पणन मंडळासह पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘हापूस आंब्याचा हंगाम बहरात आला असताना ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवरील राज्य कृषी पणन मंडळाच्या २३ व्या हापूस आंबा महोत्सवाला सोमवार (ता. १)पासून प्रारंभ होणार आहे,’’ अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

Mango
Mango Tree Burnt : ऐन बहरात शेकडो आंब्याची झाडे खाक

या वर्षीचा आंबा महोत्सव राज्य कृषी पणन मंडळासह पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील तसेच राज्यातील केसर आंबा उत्पादकांबरोबरच जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गटांचाही सामावेश असेल. महोत्सवात सुमारे १२५ स्टॉल असतील. हा महोत्सव मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत होईल.

Mango
Hapus Mango : बापर्डे येथे ५२५ ग्रॅमचा देवगड हापूस आंबा

महोत्सवात कोकण हापूससह मराठवाड्यातील केसर आंबादेखील उपलब्ध असेल. तसेच १० बचत गटांच्या स्टॉलमधून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीची संधी लाभेल. हा महोत्सव ३१ मेपर्यंत सुरू राहील. कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्याचा तसेच राज्याच्या विविध भागांतील केसर आंब्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. कदम यांनी केले.

यंदा मुबलक हापूस

‘‘गेल्या वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस आदी विविध कारणांनी आंब्याचे उत्पादन घटले होते. तर ऐन अक्षय तृतीयेला आंबा टंचाई निर्माण झाली होती. मात्र या वर्षी हवामानाने साथ दिल्याने आंबा मुबलक उपलब्ध असल्याने ग्राहकांनी अधिकाधिक आंबा खरेदी करावा,’’ असे आवाहन श्री. कदम यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com