Pune News : जागतिक बाजारात पामतेलाच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मलेशियाला चांगला आहे. इंडोनेशियाने ४० टक्के पामतेल जैवइंधनात वापरण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे येथून निर्यात कमी झाली. परिणामी पामतेलाचे भाव सोयातेल आणि सूर्यफूल तेलाच्या भावाबरोबर स्पर्धा करत आहे, असे पामतेल बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.
मुंबई येथे सुरु असलेल्या ग्लोब ऑईल काॅन्फरन्समध्ये जागतिक पाम तेलविषयक चर्चासत्रात पाम तेल बाजार विश्लेषक डाॅ. साथिया वर्का आणि मलेशियातील ग्लेनौक इकाॅनिक्सचे कार्यकारी संचालक डाॅ. जुलियन मॅक्गील यांनी ही माहिती दिली. डाॅ. वर्का म्हणाले की, मलेशिया इंडोनेशियानंतर मलेशिया जगात दुसऱ्या क्रमांकाचा पामतेल उत्पादक देश आहे.मलेशियात पामतेलाचे उत्पादन चांगले आहे. मलेशियातील महत्वाच्या उत्पादक भागात उत्पादन वाढले आहे. मलेशियात सबाह प्रांत पामतेल उत्पादनात महत्वाचा आहे. सबाह भागात मात्र उत्पादन घटले आहे.
मलेशियातून सर्वाधिक पामतेल निर्यात चीनला होत असते. म्हणजेच चीन महत्वाचा ग्राहक आहे. भारतही मलेशियाच्या पामतेलाचा महत्वाचा ग्राहक आहे. पण सध्या चीनला मलेशियातून होणारी पामतेलाची निर्यात कमी झाली आहे. तर आशियातील देशांना निर्यात वाढली आहे. भारतालाही निर्यात वाढली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टमध्ये निर्यात काहीशी वाढलेली दिसते, असेही वर्का यांनी स्पष्ट केले.
डाॅ. मॅक्गील म्हणाले की, पामतेलाचे भाव २०२२ मध्ये विक्रमी पातळीवर पोचले होते. त्यासाठी अर्जेंटीनामधील दुष्काळ, इंडोनेशियाने निर्यातीवर घातलेली बंधने आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे पामतेलाचे भाव वाढले होते. पामतेलाच्या वायद्यांमध्ये २०२४ मध्ये आतापर्यंत भावात चढ उतार दिसून आले. पण किमती मागील वर्षीच्या तुलनेत केवळ ३ टक्के जास्त किंमत होती. पामतेल उत्पादन घटत असल्याचा आणि इंडोनेशियात वापर वाढल्याचा हा परिणाम आहे. पण सोयाबीन उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होते. त्याचा परिणाम पामतेलाच्या किमतीवरही होत आहे. असे असले तरी गेल्या वर्षभरात खूप कमी वेळा पामतेलाचा भाव सोयातेलापेक्षा कमी राहीला.
इंडोनेशियात पामतेल उत्पादन कमी होत असले तरी मलेशियात उत्पादनात काहिशी सुधारणा दिसून आली. पामतेलाची किंमत सोयातेलाच्या किमतीबरोबर आहे. निर्यात चांगली सुरु आहे पण चीनला निर्यात कमी आहे. मलेशियाचे चलन असलेले रिंगीट मजबूत होत आहे. मलेशियातून निर्यातही सुरु आहे. इंडोनेशियात बायोडिझेलसाठी पामतेलाचा वापर वाढला. जानेवारी ते मे दरम्यान पामतेल सोयातेलापेक्षा महाग होते. त्यानंतर मेपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पुन्हा महाग झाले होते. आता पुन्हा स्वस्त झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.