Palkhi Sohala 2023 : वावर, वारी अन् शेतकरी : डॉ. केशव सखाराम देशमुख

Ashadhi Vaari : इथल्या खेड्यांची सकाळ भजन, कीर्तन, आरत्या, प्रवचने यांच्याच सात्त्विक आवाज आणि शब्दांनी झाली. गायी-म्हशींच्या घंटाघुंगरांचे स्वर आणि सकाळच्या कामांची धामधूम, बाया-माणसांच्या धावपळीमधून गावं जागी झालेली.
Palkhi Sohala
Palkhi SohalaAgrowon
Published on
Updated on

Vaari And Farmer : इथल्या खेड्यांची सकाळ भजन, कीर्तन, आरत्या, प्रवचने यांच्याच सात्त्विक आवाज आणि शब्दांनी झाली. गायी-म्हशींच्या घंटाघुंगरांचे स्वर आणि सकाळच्या कामांची धामधूम, बाया-माणसांच्या धावपळीमधून गावं जागी झालेली.

अगदी सर्वत्र आढळणारी शेतांतील कामांची लगबग. पेरणीपूर्व मशागती, धूळपेर किंवा वावरांच्या डागडुजी.

घराभोवतीच्या रस्त्यांची कामं. दिवाबत्तीची तयारी. खतं, बियाणं, औषधांची खरेदी. अशातच, पालख्यांची जत्रा आणि ‘वारीचे वारे’ संथ, शांत, अगदी सात्त्विक वाहणारे... गाव-शिवारांवर प्रसन्नतेची सर्वत्रच सावली. आनंदाचा महापूर. श्रीविठ्ठलाचा दाही दिशा भरून राहिलेला गजर.

दिंडीत सामील हा व्हायची तयारी. वय सारं विसरून सारेजण भाविकतेने दिंड्यांत सामील... अमृत गोडीचा ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर आभाळभर झालेला. ऊन सावल्यांचे खेळ. आभाळ भरून आलेलं. धावणारे ढग वाऱ्याची झुळूक.

दाट झाडांच्या सावल्या आणि सर्वत्र म्हणजे अगदी नजर जाईल तिथपर्यंत पाउले चालती पंढरीची वाट... विठ्ठलाची आम्हावरी सावली घनदाट... मनांत, जनांत पंढरी. मनांत पंढरी... जळी-स्थळी पंढरी... होय, एकच आस... एकच ध्यास... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!

Palkhi Sohala
Palkhi Sohala 2023 : भक्तीचा महापूर विठुरायाच्या चरणाकडे

सांगता येत नाही. किती किती वर्षं झाली. प्रत्येक वर्षी पंढरी म्हणजे नवी. नूतन. प्रत्येक वेळी विठुराया नवा. नूतन. नुसत्या त्याच्या नामस्मरणाने मनाला कसा छान थंडावा मिळत जातो.

जन्मोजन्म, ‘‘वावर, वारी, शेतकरी’’ असं एक प्रेमबंधनाचे सूत्र पिढ्यान् पिढ्या घट्ट बांधलेलं... आजोबांच्या मागल्या किती पिढ्यांपासून ‘वारी’ घरादारांशी जोडलेलीच! अशावेळी ओठांना शब्द फुटतात.


Palkhi Sohala
Palkhi Sohala: संत तुकराम महाराजांची पालखी पोहचली पुण्यात

वावर बहरून येई विठुमाऊली
पीकं डौलत राही विठुमाऊली
हंगामात नांदतो माझा विठ्ठल संखा
निसर्गात डुलतो माझ्या विठ्ठल सखा


शीण भाग जाई तुला पाहताना, मायबापा
जीवसुख वाटे दिंडीत चालताना मायबापा
आम्ही तुझे रे शेतकरी वारकरी धीराचे
आमुच्या ध्यानीमनी तुझी पंढरी धीराची


आषाढाच्या उजळल्या साऱ्या वाटा सर्वत्र
तुझ्या नामस्मरणी सुखांनाही तोटा एकमात्र
शेत फुलेल, तळे भरेल तू जगजेठी सोबतीला


गावाशिवारास सांभाळी तुझी सावली मोठी सर्वांना
रखुमाईचा पती, तुच आमुची मायबाप
तूच दूध तूच साखर, तूच दुधावरची साय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com