Land Survey : पालघरमध्ये ‘ई-मोजणी’चा विक्रम

Land Record Department Maharashtra : भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांच्या जागेच्या मिळकतीच्या मोजणीबाबतच्या कार्यवाहीसाठी ई-मोजणी व्हर्जन आज्ञावली संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.
Land Survey
Land SurveyAgrowon
Published on
Updated on

Palghar News : भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांच्या जागेच्या मिळकतीच्या मोजणीबाबतच्या कार्यवाहीसाठी ई-मोजणी व्हर्जन आज्ञावली संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये अर्जदारांना कार्यालयात न येता अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पालघर जिल्ह्यात मोजणी प्रकरणांची आवक जास्त असलेल्या पालघर आणि वसई भूमी अभिलेखात ‘भूप्रणाम केंद्र’ सुरू करण्यात आली आहेत. तलासरी, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांत मोजणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४५ दिवसांत मोजणी काम पूर्ण करून नागरिकांना सेवा दिली जाते.

Land Survey
Land Survey : राज्यात ७५ टक्के मोजणी प्रकरणे निकाली

नागरिकांच्या अर्जाप्रमाणे त्यांच्या मिळकतीचे मोजणी काम ९० दिवसांत पूर्ण करण्याचा प्रयत्न भूमी अभिलेख विभागामार्फत केला जात आहे. चार तालुके शासकीय धोरणाप्रमाणे ९० दिवसांऐवजी ४५ दिवसांत मोजणी काम पूर्ण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

Land Survey
Universal Land Survey: शेताची सार्वत्रिक मोजणी मोहीम राबवा

जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत सुमारे १६७ प्रकरणे शिल्लक होती. एप्रिल ते जूनपर्यंत एक हजार ७१ प्रकरणे प्राप्त झाली. अशा एकूण दोन हजार ३८ प्रकरणांपैकी एक हजार १६४ प्रकरणे जूनअखेर निकाली करण्यात आली असून शिल्लक प्रकरणे ८७४ आहेत, असे भूमी अभिलेख विभागाचे पालघर जिल्हा अधीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे.

जव्हारमध्ये कमी प्रकरणे शिल्लक

तलासरी तालुक्यात १४, विक्रमगडमध्ये २५, जव्हार परिसरात ११ आणि मोखाडा तालुक्यात ३८ मोजणी प्रकरणे शिल्लक आहेत. पालघर, वसई, डहाणू आणि वाडा या तालुक्यांतही राज्य सरकारच्या धोरणांना अनुसरून ९० दिवसांत मोजणी पूर्ण केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com