Paddy Plantation : पालघरमध्ये पावसाचा जोर मंदावल्याने लावणीला वेग

Paddy Farming : मागील वर्षाची नुकसानभरपाई यंदा खरीप हंगामात भरून काढावी, यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.
Paddy Farming
Paddy Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : मागील वर्षी निसर्गाच्या कोपामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. मागील वर्षाची नुकसानभरपाई यंदा खरीप हंगामात भरून काढावी, यासाठी बळीराजाची धडपड सुरू आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी करण्यात आली असून, लावणी लवकर पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ७८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी केली जाते.

Paddy Farming
Paddy Farming : डहाणूतील बळीराजाला आवणीचे वेध

त्यापैकी डहाणू तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १६ हजार ५२० हेक्टर भात क्षेत्र लागवडीखाली असून, मोखाडा तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच २०१५ हेक्टर क्षेत्रावर भातलावणी केली जाते.

यंदा पालघर जिल्ह्यात जूनमध्येच भाताच्या बियाण्यांची पेरणी केल्यामुळे आणि पाऊस नियमितपणे सुरू झाल्याने पेरलेल्या बियाण्यांची चांगली उगवण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात भातशेतीसाठी पोषक वातावरण असल्याने सात हजार १११ हेक्टर क्षेत्रावर भाताच्या विविध वाणांची पेरणी करून रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत.

Paddy Farming
Paddy Seedling : शिराळा तालुक्यात भाताच्या तरूसाठी दुबार पेरणीची वेळ

मजूर मिळत नसल्याने अडचण

विक्रमगड (बातमीदार) : शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने मजुरीच्या दरात वाढ झाली. पुरुषांना ३०० ते ३५०, तर महिलांना २०० ते २५० रुपये मजुरी दिली जाते. मजूर आणण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे.

पावसाचे सातत्य असल्याने भातशेतीसाठी पोषक वातावरण आहे. मागील काही दिवसांत जोरदार पाऊस झाल्याने चिखलणीसाठी भात खाचरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी चिखलणी करून उर्वरित भातलावणीच्या कामांना गती द्यावी. मुसळधार पावसात खतांची मात्रा देऊ नये. लावण्यासाठी भात रोपांचा तुटवडा भासल्यास रोहू पद्धतीचा अवलंब करावा.
- निलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, पालघर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com