Painted Lady Butterfly : कोल्हापुरात पेन्टेड लेडी दुर्मिळ फुलपाखराचे दर्शन, काय आहे वैशिष्ट्य

Butterfly : कोयना येथील घाटमाथा परिसर आणि जिल्ह्यातील सादळे, सिद्धोबा डोंगरात हे फुलपाखरू आढळले होते.
Painted Lady Butterfly
Painted Lady Butterflyagrowon
Published on
Updated on

Painted Lady Rare Butterfly : कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील महालक्ष्मी देवराईमध्ये झाडांना पाणी घालत असताना निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे डॉ. अमोल पाटील यांना पेन्टेड लेडी या दुर्मिळ फुलपाखराचे दर्शन झाले. याआधी त्यांना कोयना येथील घाटमाथा परिसर आणि जिल्ह्यातील सादळे, सिद्धोबा डोंगरात आढळले होते.

महालक्ष्मी तलावाच्या पूर्वेला महालक्ष्मी देवराई आहे. येथे निसर्गप्रेमी मित्र मंडळाचे सदस्य अनेक दिवस पाच हजार रोपे जगवण्यासाठी त्यांना श्रमदानातून पाणी देण्याचे काम करतात. हे सदस्य झाडांना पाणी देत असताना या दुर्मिळ फुलपाखराचे त्यांना दर्शन झाले.

पेन्टेड लेडी हे (Nymphalid) कुलातील आकाराने दोन-तीन इंच असलेले खुप सुंदर फुलपाखरू आहे. ते खूप दूरचा प्रवास म्हणजेच स्थलांतर करणारे आहे. आंतरखंडीय स्थलांतर करणारा जीव युरोप ते आफ्रिका व उलट असा प्रचंड प्रवास करतो.

काही आफ्रिका ते आशिया खंड असा हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. स्थलांतर करण्याच्या त्यांच्या या सवयीमुळे ही फुलपाखरे जगभर सगळीकडेच पसरतात, केवळ ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका खंडात आढळून येत नाहीत. उत्तर अमेरिका ते दक्षिण अमेरिका असे स्थलांतर करायला या फुलपाखरांच्या सहा पिढ्या लागतात, असे अभ्यासकांचे मत आहे.

Painted Lady Butterfly
Amol Kolhe : केंद्र सरकारच्या शेतीविरोधी धोरणाबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा. कोल्हेंची फटकेबाजी! 

जगभर फुलपाखरू पसरले असले तरी भारतात यांची संख्या कमी आहे. याच स्थलांतरामुळे या फुलपाखरांच्या उपजाती नाहीत. या फुलपाखरांच्या अळ्या विषारी चीक असलेल्या वनस्पतींवर उपजीविका करतात आणि ते द्रव्य शरीरात साठवून ठेवतात. त्यामुळे परजीवी शत्रूना या अळ्या आवडत नाहीत. ही फुलपाखरे भारतात हिवाळ्यानंतर पावसाळ्यापर्यंत दिसतात. फुलपाखरू अभ्यासक डॉ. संतोष उमराणे, फारुक म्हेतर यांच्याकडून फुलपाखराची अधिक माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com