Operation Mahadev: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार; ऑपरेशन महादेव यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा

Pahalgam Attack Revange: भारतीय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज (ता.२८) ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा चालू असतानाच बैसारण खोऱ्यात २२ एप्रिलचा हल्ला करणारे दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे.
Operation Mahadev
Operation MahadevAgrowon
Published on
Updated on

Pune News: भारतीय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज (ता.२८) ऑपरेशन सिंदूरविषयी चर्चा चालू असतानाच बैसारण खोऱ्यात २२ एप्रिलचा  हल्ला करणारे दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. श्रीनगरमधील दाचिगाम परिसरात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत केलेल्या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सुलैमान शाह उर्फ मुसा फौजीसह तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला.

या कारवाईत १७ ग्रेनेड्स, एक एम४ कार्बाईन आणि दोन एके-४७ रायफल्स जप्त करण्यात आल्या. संसदेत आज 'ऑपरेशन सिंदूर'वर चालू असलेल्या चर्चेत विरोधकांनी घेरल्यानंतर या कारवाईचा सरकारला बचावात्मक भूमिका घेण्यास मदत होणार आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसारण खोऱ्यात झालेला हल्ला हा काश्मीरमधील अलीकडच्या काळातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक होता.

Operation Mahadev
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून गदारोळ

या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या लष्कर-ए-तय्यबाच्या उपगटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. बैसारण खोरे, ज्याला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते, तिथे पर्यटक पिकनिकसाठी जमले असताना हा हल्ला झाला. प्रत्यक्षदर्शी आणि तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना लक्ष्य केले आणि गैर-मुस्लिम व्यक्तींना ठार मारले.

ऑपरेशन महादेव कसे पार पडले?

जुलै महिन्याच्या सुरुवातीला दाचिगामच्या जंगलात लष्कराला संशयास्पद संदेश आल्याचं आढळलं. त्यानंतर लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटांच्या संयुक्त टोळीवर १४ दिवस सतत पाळत ठेवण्यात आली. स्थानिक भटक्या जमातींनीही या दहशतवाद्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली, ज्यामुळे लष्कराला त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात मदत झाली.

Operation Mahadev
Pahalgam Attack: ‘पहलगाम’च्या दोन महिन्यांनंतर...

सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅरा युनिटच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध घेतला. उत्कृष्ट युद्धनीतीचा वापर करत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. सध्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. यानंतरच या दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याशी संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होईल.

मुसा फौजी कोण होता?

सुलैमान शाह उर्फ मुसा फौजी हा पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. याशिवाय, गेल्या वर्षी श्रीनगर-सोनमर्ग महामार्गावरील झेड-मोरह बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या सात जणांच्या हत्येतही त्याचा हात होता. त्याच्या दहशतवादी कारवायांमुळे तो सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता.

पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कार्यरत आहे. गेल्या महिन्यात या प्रकरणी दोन स्थानिकांना, परवेझ अहमद जोठर आणि बशीर अहमद, यांना दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

ऑपरेशनचे नाव आणि स्थान

ही कारवाई झबारवान आणि महादेव रिजच्या मधल्या परिसरात झाली, त्यामुळे तिला 'ऑपरेशन महादेव' असे नाव देण्यात आले. दाचिगामच्या घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढणे हे लष्करासाठी मोठे आव्हान होते, पण स्थानिकांच्या मदतीने आणि अचूक नियोजनाने हे ऑपरेशन यशस्वी झाले.

हा हल्ला आणि त्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूरद्वारे' दिलेले उत्तर यावर आज संसदेत चर्चा होत आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर या हल्ल्यामागील दहशतवाद्यांना पकडण्यात अपयश आल्याचा आरोप वारंवार केला आहे. चर्चेत विरोधकांनी घेरल्यानंतर या कारवाईचा सरकारला बचावात्मक भूमिका घेण्यास मदत होणार आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com