Paddy Sowing : ‘शिराळा पश्चिमोत्तर’मध्ये भात पेरणीची लगबग

Paddy Season : तालुक्यासह तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीने शेतशिवारात चांगलाच जोर धरला आहे. जूनच्या पहिल्या पंधरावड्यापूर्वी भात पिकाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत.
Paddy Sowing
Paddy SowingAgrowon
Published on
Updated on

Shirala News : तालुक्यासह तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप हंगामातील भात पिकाच्या पेरणीने शेतशिवारात चांगलाच जोर धरला आहे. जूनच्या पहिल्या पंधरावड्यापूर्वी भात पिकाची पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग विविध वाणाच्या भात पिकाचे माहेरघर म्हणून संबोधला जातो. तालुक्यात प्रत्येक वर्षी मे महिन्यात ‘धूळवाफ’ पद्धतीने भात पेरणीला सुरवात होते.

चालू वर्षी वळवाच्या पावसाचे आगमन उशरा झाल्याने ‘रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा’ अशा बळीराजाच्या म्हणीवर रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त शेतकऱ्यांना साधता आला नाही. सध्या शेतशिवारात विविध वाणांच्या भात पिकांची पेरणी करण्यासाठी बळीराजा, त्यांच्या कुटुंबीयांची चांगलीच धांदल उडालेली आहे.

Paddy Sowing
Paddy Sowing : मुळशीत धूळवाफेवरील भातपेरणीला सुरवात

भात पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी पारंपरिक तसेच संकरित बियाणांच्या वाणांना विशेषतः प्राधान्यक्रम देताहेत. भात पिकांच्या जातीमध्ये कोमल, सोनम, जोंधळे, आरवन, इंद्रायणी, बासमती, सिल्की ७७७, नातपोहा, मेनका, सुप्रीम सोना, इंद्रायणी, मधुमती, वायएसआर, जोरदार, आमन, वडाकोलम, रत्नागिरी २४, ओम-३, रुची, पूनम, शतायू, सुमा, सिल्की २७७ कर्जत ३, ४, कोमल, ओमश्रीराम, भावना आदी सुधारित वाण आहेत. सर्वत्रच भात पेरणीला गती आल्याने परिसरातील कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडालीय.

भात पिकाच्या पेरणीने सारा शेतशिवारच माणसांनी बहरलाय. इंद्रायणी, कोमल, आरवन आदी भात पिकांच्या वाणांना शेतकरी बांधवांची अधिक मागणी असल्याची माहिती ‘सकाळ’शी बोलताना कृषी केंद्रचालक अजित शेणवी यांनी दिली.

Paddy Sowing
Summer Paddy Sowing : डहाणूत उन्हाळी भातशेतीची लगबग
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाच्या विविध वाणांची बैलजोडीने, हाताने कुरी ओढून पेरणी केली जाते. पेरणी करणाऱ्याला ‘पेरक्या’ म्हणतात. पेरक्याच्या पोटाला पेरणीचा झोळा बांधतात, सातत्याने एकसारखी दोन्ही हातांची बोटे चाळवीत, कुरीमागून चालत पेरक्या भात कुरीच्या चाढ्यातून सोडतो. पेऱ्यावर भाताची उगवण अवलंबून असल्याने पेरक्याचे काम जोखमीचे असते.
संजय सपकाळ, बाबूराव खांडेकर, पंढरीनाथ मस्के, भात पेरके.
सातत्याच्या वाढत्या महागाईने शेतकऱ्यांना बैलजोडी पाळणे परवडत नाही. छोट्या-मोठ्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत करणेही शेतकऱ्यांना परवडेना. बैलांच्या सदृढ आरोग्यासाठी त्यांना ओल्या, वाळक्या चाऱ्यासह खपरी पेंड, गहू, मक्याचे पीठ दैनंदिन खुराक म्हणून द्यावे लागतेय. बैलजोडीने शेत शिवारातील कढा-कोपरांसह शेतीची चांगली मशागत होते, पीकही जोमाने येते.
यशवंत मस्के, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com