Paddy Procurement : अलिबाग जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर भात खरेदी

Paddy Procurement Center : एक महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकरी भातखरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.
Paddy Buying Center
Paddy Buying CenterAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत ३८ केंद्रांवर खरीप व रब्बी पणन हंगामात शेतकऱ्यांना भाताची विक्री करता येणार आहे.एक महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकरी भातखरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.

भाताची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली. त्‍यानुसार शेतकऱ्यांना नियोजन करावे लागत आहे. खरेदी केंद्रावर भातविक्रीसाठी आणताना शेतकऱ्यांनी सोबत आधारकार्ड आणि बँकेचे पासबुक आणणे आवश्यक आहे.

Paddy Buying Center
Paddy Procurement : भातखरेदी केंद्रात ऑनलाइन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ

रोज सायंकाळी केंद्र बंद झाल्यानंतर खरेदी न झालेले धान सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांवर टाकण्यात आली आहे. भातखरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी जमिनीचा सात बारा उताऱ्याची आणि गाव नमुना ८(अ)ची छायाकिंतप्रत केंद्रावर आणणे आवश्यक आहे. या उताऱ्यातील धान्य व धानाखालील क्षेत्र पाहून ते खरेदी करता येणार आहे.

भाताला २ हजार १८३ रु. दर

सर्वसाधारण भाताला २ हजार १८३ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर झाला आहे. तर अ दर्जाच्या भाताला २ हजार २०३ प्रति क्विंटल दर दिला आहे. रायगड जिल्ह्यात भाताची विक्री होते. त्यामुळे ३८ केंद्रांवर भातखरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. धान खरेदी करताना ते स्वच्छ कोरडे असावे.

Paddy Buying Center
Paddy MSP : धान हमीभावात पाच वर्षांत तुटपुंजी वाढ

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सरकारने निर्धारीत केलेल्या धानाच्या ‍आधारभूत किंमती, दर्जा, खरेदी केंद्र व त्याला जोडलेली गावे दर्शवणारे फलक, सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणी नोटीस बोर्डवर दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना आहेत. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित नवे भात खरेदी करण्यात येईल.

पैसे ऑनलाईन जमा होणार

खरेदी केलेल्या धान देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सरकारचे निर्देश आहेत. ही रक्कम धान भरडधान्य खरेदी केलेल्या दिवसांपासून दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशा सरकारच्या सूचना आहेत.

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत केंद्र सरकारने विहित केलेल्या विनिर्देशात एफएक्यू दर्जाचेचे धान्य, भरडधान्य खरेदी केले जाईल. केंद्र सरकारने विहित केलेल्या प्रमाणापेक्षा आर्द्रता जास्त आढळल्यास धान खरेदी करण्यात येणार नाही. जास्त ओलसर किंवा बुरशीयुक्त धान विक्रीसाठी आणू नये. केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान खरेदी केले जाईल. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे भरडधान्य असेल, ते स्वच्छ व कोरडे असायला हवे. ते विक्री योग्य असल्याची खातरजमा केल्यावरच भाताची खरेदी करण्यात येईल.
- सर्जेराव सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com