Paddy Sowing : मजूरटंचाईमुळे शेतकऱ्यांचा पेर भाताकडे कल

Labor Migration : कधीकाळी मजुरांचा भरणा असलेल्या या तालुक्यात आता उद्योगधंद्यांच्या अभावामुळे अनेक मजूर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : इगतपुरी तालुक्यात पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली असली, तरी त्याआधी झालेल्या समाधानकारक पर्जन्यामुळे सर्वच गावांमध्ये भातलागवडीच्या (आवणी) कामांना चांगला वेग मिळालेला आहे.

इगतपुरी तालुक्यातील १२४ गावे आणि १५० हून अधिक वाड्यांमध्ये दर वर्षी ३० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भातलागवड केली जाते. येथील शेतकरी सुरती, गुजरात-११, गुजरात थाळी, रत्ना, सुवर्णा, कर्जत, इंद्रायणी, सह्याद्री, सोनम हाळी, आर-२४, जीओ, एक हजार आठ, राधा फुले आणि मसुरी या वाणांची लागवड करतात. यातील इंद्रायणी वाण राज्यभर प्रसिद्ध आहे.

कधीकाळी मजुरांचा भरणा असलेल्या या तालुक्यात आता उद्योगधंद्यांच्या अभावामुळे अनेक मजूर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतकामासाठी मजूर मिळत नाहीत, ही शेतकऱ्यांची प्रमुख अडचण बनली आहे.

Paddy Farming
Paddy Farming : वाड्यातील भातपीक शेती दिवसेंदिवस खर्चिक

भातलावणीसाठी यांत्रिक साधनांची कमतरता असून कृषी विद्यापीठातील यंत्रे महागडी असल्याने ती सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे शेतकरी परंपरेनुसार शेतातील देवांना नैवेद्य अर्पण करून लागवडीला सुरवात करतात.

मात्र सर्वत्र एकाच वेळी लागवड सुरू झाल्याने मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे खर्डी, शहापूर, कसारा, आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणावे लागत आहेत.

मजुरीचे दर गगनाला भिडले

मजूरटंचाई, स्थलांतर, घराघरांतील विभक्त कुटुंबव्यवस्थेमुळे गावागावात माणसे कमी झाली आहेत. त्यामुळे ऐन हंगामात मजूर मिळणे कठीण झाले असून दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दररोज एका मजुराला ३०० ते ३५० रुपये मजुरी आणि जेवणाचा खर्च शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे. त्यामुळे भातशेती खर्चिक आणि अकार्यक्षम होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

Paddy Farming
Paddy Farming : भुदरगडमध्ये ३० टक्के रोपलावणी रखडली

पेर भात शेतीकडे वळण

खतांचे, यंत्रसाधनांचे वाढलेले दर आणि अनियमित मजुरीमुळे शेतकरी पेरभात शेतीकडे वळले आहेत. यंदा ३० ते ४० टक्के क्षेत्रात पेरभात पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. चांगली मशागत करून थेट पेरणी केली जात असून त्यासाठी मनुष्यबळ कमी लागते. त्यामुळे अनेकांनी ही पद्धत निवडली आहे. काही शेतकरी केवळ स्वतःच्या उपजीविकेसाठी पुरेल इतकीच भातलागवड करत आहेत. त्यामुळे उर्वरित शेती ओस पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

भात शेतीही झाली तोट्याची

भाताचे बाजारभाव गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहेत. मात्र उत्पादन खर्च सतत वाढत असल्याने भातशेती तोट्यात जात आहे. परिणामी शेतकरी पारंपरिक पद्धतींपासून दूर जाऊन एस.आर.टी., एस.आर.आय., डम सिडर, बावचा, वापे यांसारख्या आधुनिक शेतीतंत्राचा अवलंब करत आहेत. तालुक्यात यंदा सुमारे ५० एकर क्षेत्रात एस.आर.टी. आणि सहा ते सात एकरात मल्चिंग पद्धतीने भातलागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com