Paddy Farming : भुदरगडमध्ये ३० टक्के रोपलावणी रखडली

Paddy Plantation : या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केली. मशागतीला वेळच मिळाला नसल्याने पेरण्याच खोळंबल्या. धूळ वाफ पेरणी किंवा जून महिन्यातील भाताची टोकनी झालीच नाही.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : या वर्षी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाने सुरुवात केली. मशागतीला वेळच मिळाला नसल्याने पेरण्याच खोळंबल्या. धूळ वाफ पेरणी किंवा जून महिन्यातील भाताची टोकनी झालीच नाही.

भुदरगड तालुक्यात या वर्षी १६ हजार १४० हेक्टरवर खरीप लागवड झाली असून ३० टक्के रोपलावणी रखडल्या आहेत. जादा पाऊस झाल्याने शेतात पाणी साठून राहिले. त्यामुळे यंदा बळीराजा पेरणी क्षेत्रावर भात रोपलावणीच करताना दिसत आहे.

सध्या भुदरगड तालुक्यातील शेतकरी रोप लावणीच्या कामात व्यस्त आहे. रोपलावणीची झुंबड उडाली आहे. मात्र, सध्या भातांच्या रोपांचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. बैलांची संख्या घटल्याने रोपलावणीसाठी रोटावेटरचाच वापर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. क्वचित ठिकाणीच चिखल करण्यासाठी बैलांचा वापर होताना दिसत आहे.

Paddy Farming
Paddy Cultivation: पुणे जिल्ह्यातील भात लागवडी खोळंबल्या

तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. १५ जुलैअखेर तालुक्यात ३०२.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उसापाठोपाठ भात पीक घेतले जाते. पाटगाव, कडगाव, पिंपळगाव परिसरात रोपलावण पद्धतीने, तर अन्य परिसरात टोकण पद्धतीने भाताची पेरणी केली जात होती. विशेष म्हणजे रोपलावण पद्धतीत कष्ट जास्त असले तरी भाताचे उत्पादन चांगले मिळते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Paddy Farming
Paddy Farming : रत्नागिरी जिल्ह्यात भातशेतीची ३६,७२६ हेक्टरवर लागवड

गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना पाण्यासाठी धावपळ करावी लागली. शेतात पाणी साठवून रोटवेटरने किंवा बैलजोडीने चिखल करून त्यात भाताची तयार रोपे लावली जात आहेत. चिखलाची चांगली घुसळण केल्याने तणांचा नाश होऊन पीक उत्पादन चांगले होते.

तरवा टंचाईचा सामना

वळीव आणि मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांना रोहिणी नक्षत्रात भाताची धूळ वाफ पेरणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाच्या रोप लावणीसाठी तरवा पेरणी केली होती.

मात्र, सततच्या पावसामुळे तरव्यांची उगवण झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना तरवा टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या ओळखीच्या, पाहुण्यांकडे तरवा मिळण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com