Paddy Snail Attack : भात पिकाला शंखी गोगलगायींचा धोका

Kharif Season : सध्या खरीप हंगामासाठी बळीराजाची भातलावणीची लगबग सुरू आहे. चांगले पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत.
Paddy Snail Attack
Paddy Snail AttackAgrowon
Published on
Updated on

Palghar News : सध्या खरीप हंगामासाठी बळीराजाची भातलावणीची लगबग सुरू आहे. चांगले पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत. मे महिन्यापासून पाऊस सुरू राहिल्याने जमिनीत ओलावा राहिला आहे. परिणामी, तालुक्यात अनेक ठिकाणी शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

शहापूर तालुक्यात मागील वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शंखी गोगलगायचा जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होतो. अंडी देण्याचे अधिक प्रमाण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोगलगायीचा जन्म होतो.

Paddy Snail Attack
Snail Control : असा करा गोगलगायींचा नायनाट

या गोगलगाय रात्रीच्या वेळी पानांना, फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवरही उपजीविका करून पिकांचे नुकसान करतात. गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेतील पिकांवर असते. या अवस्थेत रोपांची शेंडे कुरतडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

ओढे, नाले, कालवे आणि नदीकाठच्या जमिनींतील पिकांना शंखी गोगलगायी धोका अधिक आहे. भातपिकांना याचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. शंखी गोगलगायीचा धोका हा प्रामुखाने पिकांची उगवण सुरू झाल्यानंतर होतो. उगवून आलेली पिकांची पाने कुरतडल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. तरी गावपातळीवर कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यात येत आहे.

Paddy Snail Attack
Snails Management : नुकसानकारक गोगलगायींचे व्यवस्थापन

...या कराव्यात उपाययोजना

झाडावर लपलेल्या गोगलगाय हाताने गोळा करून साबणाच्या प्रावणात बुडवाव्यात आणि खड्ड्यात पुरुरून टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. गोगलगाय आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या प्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगाय जमा करून नष्ट कराव्यात. गोगलगाय जमा करताना हातमोजे व तोंडावर मास्क घालावा.

भात बियाण्यांची पेरणी पूर्ण

शहापूर तालुक्यात १४९२ हेक्टर क्षेत्रात भातबियाण्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. नागळीची १४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी, तर वरईची १५९.७० हेक्टरवर केली आहे. एसआरपी अर्थात वाफा पद्धतीने १२८ हेक्टर क्षेत्रात भाताची पेरणी झाली आहे. भाताची फेरपेरणी १७ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. यावर्षी भात रोपांच्या लागवडीचे ९५ टक्के उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com