Paddy Bonus : धानाला हवा एकरी दहा हजारांचा बोनस

Paddy Procurement : धान उत्पादकांना एकरी १० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते व माजी आमदार भेरसिंग नगपुरे यांनी केली आहे.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Updated on

Gondiya News : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात धानाची लागवड होते. मात्र गेल्या काही वर्षात धानाच्या हमीभावात तुटपुंजी वाढ केली जात असल्याने उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे धान उत्पादकांना एकरी १० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी नेते व माजी आमदार भेरसिंग नगपुरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री, कृषिमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. निवेदनानुसार, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच नागपूर जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण एकाच पिकावर अवलंबून आहे.

Paddy
Paddy Rate : भात, नाचणी नोंदणीस मुदतवाढ

परिणामी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. अवकाळी पावसाच्या एका फटक्‍यात तोंडचा घास हिरावला जातो. ही परिस्थिती गेल्या काही वर्षात अनेकदा ओढवली आहे. ही बाब लक्षात घेता यंदाच्या हंगामात उत्पादीत धानाला पाच एकराच्या मर्यादेत एकरी दहा हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Paddy
Paddy Market : खर्डीत भाताची कवडीमोल दराने विक्री

थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा करण्यात यावी, अशी मागणीही नागपुरे यांनी केली आहे. एकरी सहा हजार रुपये इतका बोनस यापूर्वी देण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यात वाढ करून तो दहा हजार रुपये करावा, अशी मागणी आहे.

महात्मा फुले कर्जमुक्‍ती योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी अंतर्गंत नियमित कर्जदारांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात यावे, अशी मागणी देखील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com