Eknath Shinde : धान उत्पादकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा ; हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करणार

Paddy Bonus : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भंडारा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात धानाला नागपूर हिवाळी अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची घोषणा केली.
ShasanAaplyDari
ShasanAaplyDariAgrowon
Published on
Updated on

Shasan Aaply Dari in Bhandara : पावसाच्या खंडामुळे धानाच्या पिकाचे नुकसान झाले. (Paddy Crop Damage) त्यामुळे भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर धान उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात बोनस देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ShasanAaplyDari
Paddy Procurement : धान खरेदी केंद्राच्या प्रश्‍नावर मुंबईत बैठक

भंडारा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भात धान हे प्रमुख पीक आहे. पावसाचा खंड आणि काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

शिंदे म्हणाले, आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्तांना चांगली मदत देता यावी म्हणून एनडीआरएफचे नियम बाजूला ठेऊन अधिक मदत देण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. पूरबाधित कुटुंबांना 10 हजार रुपये भरपाई देण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com