Paddy Bonus : धान उत्पाकांना मिळणार प्रति हेक्टर २० हजारांचा बोनस ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Assembly Winter Session : राज्यात शिंदे सरकार आल्यापासून गेल्या दिडवर्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांना विक्रमी ४४ हजार २७८ कोटींची मदत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितले.
Paddy Bonus
Paddy BonusAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून गेल्या दिड वर्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजारांचा बोनस देण्यात येणार असल्याचेही सांगितले. शिंदे म्हणाले, आम्ही धानाच्या नुकसानीची पाहणी केली. यावर्षी अंदाजे पाच लाख शेतकऱ्यांना २० हजार रुपये बोनस जाहीर करत आहोत, त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.

सन २०२२-२३ या वर्षात प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे धानाचा बोनस देण्यात आला होता. याचा ४ लाख ८० हजार शेतकऱ्यांना लाभ झाला होता. हा बोनस प्रति शेतकरी जास्तीत-जास्त दोन हेक्टरपर्यंत देण्यात आला होता, त्यासाठी ८२३ कोटी रुपये वाटप करण्यात आले होते.

Paddy Bonus
Paddy Procurement : सिंधुदुर्गात ४३ केंद्रांवर भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दिड वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ४४ शेतकऱ्यांना १८ हजार ६७२ कोटींची कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. या सर्व शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

Paddy Bonus
Paddy Crop: भात पिकासाठी बारदानेची तयारी जोरात

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स

राज्यात शेतकरी आत्महत्या समस्या गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने नव्याने टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेती फायदेशीर कशी करता येईल, यासाठी टास्क फोर्स काम करणार आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होणार नाही, असे शेतीचे मॉडेल कसे विकसित करता येईल, यासाठी टास्क फोर्स काम करेल.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा

प्राथमिक अनुमानानुसार राज्यात अवकाळी पावसामुळे सुमारे ९.७५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली.

यावेळी शिंदे म्हणाले की, सहा जिल्ह्यांमध्ये नुकसानीचे मुल्यांकन बाकी असून ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. नुकसानीच्या मदतीपोटी प्रातिनिधिक स्वपरूपात काही शेतकऱ्यांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच नुकसानभरपाईची रक्कम थेट जमा केली जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com