Paddy In Panjab : धान खरेदीप्रश्नी पंजाबमधील शेतकरी संतप्त; पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार, दुपारी करणार चक्का जाम

United Kisan Morcha : पंजाब राज्यातील शेतकरी धान खरेदीला होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर चक्का जाम संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वात केले जाणार आहे.
United Kisan Morcha
United Kisan MorchaAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंजाबमध्ये धान खरेदीवरून पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. राज्यात धान खरेदी होत नसल्याने शेतकरी हरियाणाची वाट धरत आहेत. तर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१३) संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) नेतृत्वात चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत शेतकरी चक्का जाम करून सरकारचा निषेध करतील. या आंदोलनात शेतकरी संघटना, राईस मिलर्स, व्यापारी मंडळे आणि कामगार संघटनांचा सहभाग असणार आहे.

पंजाब आणि हरियाणासह बहुतांश राज्यांमध्ये धानाची सरकारी खरेदी सुरू झाली आहे. मात्र पंजाबमध्ये धान खरेदी प्रक्रियेतील दिरंगाईसह विविध समस्या उद्भवल्या आहेत. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. यावरून शेतकऱ्यांनी आज चक्का जाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या सरकारपर्यंत नेण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात चंदीगडसह राज्यभरातील प्रमुख रस्त्यांवरील चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

United Kisan Morcha
Paddy Procurement : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र सुरू करा

तसेच सोमवारी (ता.१४) याप्रकरणी संयुक्त किसान मोर्चाचे नेते शेतकरी संघटना, राईस मिलर्स, व्यापारी मंडळे आणि कामगार संघटनांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. पण प्रश्न न सुटल्यास आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिला आहे.

याआधी धान खरेदीतील दिरंगाईवरून पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. तसेच एसकेएमने शुक्रवारीच याबाबत बैठक घेतली होती. तसेच सरकार आणि प्रशासनाच्या कानापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आवाज पोहचवण्यासाठी रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्काजाम केला जाईल. राज्यभरातील वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

United Kisan Morcha
Paddy Farmers : धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत नोंदणी करण्यास पुन्हा मुदतवाढ

राज्य सरकार शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत गंभीर नसल्याचा आरोप एसकेएम नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी केला. सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे आता दुर्लक्ष करत असून सरकारला जागं करण्यासाठी आम्ही १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत रास्ता रोको करत चक्का जाम करण्याचा निर्णय घेतल्याचे राजेवाल यांनी स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारने धान खरेदीची आश्वासने देऊनही प्रत्यक्षात कोणतीही खरेदी होत असलेली दिसत नाही, असा दावा देखील राजेवाल यांनी केला आहे.

यावेळी पंजाब आहतिया असोसिएशनचे अध्यक्ष रविंदर सिंग चीमा यांनी सांगितले की, धान्य बाजारात धानाची खरेदी थांबली आहे. याचे कारण धान साठवण्यासाठी जागाच कमी आहे. बहुतांश राईस मिलर्सनी अद्यापही साठा घेण्यास सहमती दर्शवलेली नाही. त्यामुळेच धानाची खरेदी ठप्प झाली आहे. याचा फटका दलाल व शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान शेतकरी आणि पंजाब आहतिया असोसिएशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य सचिव केएपी सिन्हा यांचीही भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसांत राज्य सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन अध्यक्ष रविंदर सिंग चीमा यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com