Base Price Purchase Scheme : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भात व नाचणी, नोंदणीस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

Farmers Scheme : शेतकऱ्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.
Base Price Purchase Scheme
Base Price Purchase Schemeagrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture Department : आधारभूत किंमत खरेदी योजना २०२३-२४ अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) रागी (नाचणी) विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेले धान (भात) नाचणी (रागी) हमीभावाने विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर समक्ष जाऊन नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले.

याबाबत फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी नोंदणी सुरु आहे. चंदगड तालुक्यातील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित तुर्केवाडी, कृषीमाल फलोत्पादन सहकारी खरेदी विक्री संघ, आजरा तालुक्यातील किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ, राधानगरी तालुक्यातील शेतकरी सहकारी संघ सरवडे, ज्योतिर्लिंग सहकारी भाजीपाला खरेदी विक्री संघ मर्यादित राशिवडे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी उद्योग खरेदी विक्री संस्था मर्यादित कोल्हापूर. भुदरगड तालुक्यातील शेतकरी सहकारी संघ मर्यादित गारगोटी. सहकारी कृषी औद्योगिक भाजीपाला व फळे खरेदी विक्री संघ मर्यादित गारगोटी. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे नोंदणी सुरु आहे.

शासनाने FAQ प्रतीच्या धान (भात) साठी २ हजार ९८३ रुपये व रागी (नाचणी) साठी ३ हजार ८४६ रुपये प्रति क्विंटल हा हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा चालू (२०२३-२४) हंगामामधील धान (भात) व नाचणी पिक पेरा याची नोंद असलेला ७/१२ उतारा आधार कार्डची झेराक्स, बँक पासबुक आवश्यक आहे.

Base Price Purchase Scheme
Cashew Board Kolhapur : अखेर काजू बोर्डाच्या विभागीय कार्यालयास मंजुरी, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडकरांना यश

शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक असल्यास शेतकऱ्यांनी फोटोसाठी केंद्रावर स्वतः उपस्थित राहावे लागणार आहे. संबंधित ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

अधिक माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com