Gokul Milk Sangh : 'गोकुळ' सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गाय दूध ३० रुपयेप्रमाणे खरेदी करणार

Cow Milk Rate : राज्य सरकारने जुलै महिन्यात गायीच्या दुधाला ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढूनही राज्यातील अनेक दूध संघ दर कमी देत आहेत.
Gokul Milk Sangh
Gokul Milk Sanghagrowon
Published on
Updated on

Milk Rate : राज्य सरकारने जुलै महिन्यात गायीच्या दुधाला ३४ रुपये दर देण्याचा आदेश काढूनही राज्यातील अनेक दूध संघ दर कमी देत आहेत. दरम्यान सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील खाजगी दूध संघ जवळपास २८ रुपये लिटर प्रमाणे दूध घेत असल्याने तेथील दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे 'गोकुळ'कडून सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गायीचे सर्व दूध खरेदी करा, अशी मागणी सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दूध संस्था व उत्पादकांनी गोकुळकडे केली आहे.

राज्यातील इतर संघांकडून गाय दूध खरेदी दरास सरासरी २८ रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे, गाय दुधाला प्रतिलिटर ३३ रुपयांऐवजी ३० रुपये दर द्या. पण 'गोकुळ'कडून सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील गायीचे सर्व दूध खरेदी करा, अशी मागणी सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दूध संस्था व उत्पादकांनी गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्याकडे काल (ता.२०) केली. त्यामुळे 'गोकुळ'कडून सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दूध ३० रुपयेप्रमाणे खरेदी केले जाणार आहे.

'गोकुळ' च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात 'गोकुळ'चे पदाधिकारी आणि दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बनाळी (ता. जत, सांगली) येथील जोतिलिंग सहकारी संस्थेचे संजय पाटील म्हणाले, 'इतर संघांकडून अपेक्षित दर मिळत नाही. याशिवाय, दररोजचे दोन ते तीन वेळचे दूध स्वीकारतीलच याची खात्री नाही. त्यामुळे, गोकुळने सांगली, सोलापूरसह इतर जिल्ह्यांतील गायीचे दूध प्रतिलिटर तीन रुपये कमी करून स्वीकारावे.

मंगळवेढा गुंजेगाव येथील विजया दूध संस्थेचे बाबासाहेब रेड्डी म्हणाले, 'देशात नावाजलेल्या एका मोठ्या दूध संघासह राज्यातील इतर संघांकडून पाईप गळतीसह इतर कारणे सांगून दोन ते तीन वेळेचे दूध अचानकपणे स्वीकारत नाहीत.'

Gokul Milk Sangh
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, १०१ कोटी ३४ लाखांचा दिला फरक

माणगंगा (कडलास, जि. सोलापूर) संस्थेचे शिवाजीराव गायकवाड, संभाजी चौगले (अकोला), अभिजित चव्हाण (कवठेमहांकाळ) यांनी 'गोकुळ'चा कारभार पारदर्शी असून येथील फॅट, एसएनएफ, वजन काटा व्यवस्थित आहे. वेळेत बिले दिली जातात, असे सांगितले. यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, किसन चौगले, बयाजी शेळके उपस्थित होते.

सध्या १ लाख ६८ हजार लिटर दूधपुरवठा कडलास, अकोला व गुंजेगाव (जि. सोलापूर) व बनाळी आणि कदमवाडी (जि. सांगली) येथून फेब्रुवारी २०२३ मध्ये गोकुळला गायीच्या दुधाचा प्रतिदिन ११ हजार ८०९ लिटर पुरवठा होत होता. सध्या १ लाख ६८ हजार १४ लिटर दूध पुरवठा केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com