Crop Insurance : अहिल्यानगरमध्ये खरीप पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Kharif Season : यंदा आतापर्यंत १ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी तीन लाख ४५ हजार अर्ज करून १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : खरीप पिकांसाठी सध्या असलेल्या पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात सहभाग अत्यंत कमी आहे. यंदा आतापर्यंत १ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी तीन लाख ४५ हजार अर्ज करून १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. ६ लाख ६२ हजार ०९१ शेतकऱ्यांनी ११ लाख ७० हजार ०९४ अर्जांतून गेल्या वर्षी ६ लाख ७३ हजार ९३७ हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवला होता. एक रुपयांत विमा योजना बंद झाल्याने सहभाग घटल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा खरिपात आतापर्यंत ६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अवेळी पाऊस, वादळ व नैसर्गिक अपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि झालेले नुकसान भरून निघावे यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून विमा योजनेत सहभागी होता येत होते.

Crop Insurance
Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यंदा मात्र ही योजना बंद झाली. त्याचा परिणाम यंदा विमा योजनेतील सहभागावर दिसून येत आहे. यंदा आतापर्यंत १ लाख ७० हजार शेतकऱ्यांनी तीन लाख ४५ हजार अर्ज करून १ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चार लाखांहून अधिक क्षेत्र आणि शेतकरी संख्याही घटली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा निरुत्साह

३१ जुलैपर्यंत सहभागाची तारीख होती, मात्र सहभाग कमी असल्याने व अनेक शेतकरी लाभ घेण्यापासून राहिले असल्याने १४ ऑगस्टपर्यंत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी आतापर्यंतचा सहभाग पाहता यंदा पीकविमा योजनेत सहभाग गतवर्षीपेक्षा बराच कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पीकविमा उतरवल्याची स्थिती (रविवारपर्यंत (ता. ३))

सहभागी शेतकरी ः १,६९,१८६

सहभागी अर्ज बिगरकर्जदार ः ९२६

सहभागी अर्ज कर्जदार ः ३,४३,४३७

पीकविमा घेतलेले क्षेत्र ः १,८४,४९८ (हेक्टर)

शेतकऱ्यांनी भरलेला विमाहप्ता ः १९ कोटी ७६ लाख ४१ हजार २३९

केंद्र व राज्य सरकारने भरलेला विमा हप्ता ः १२७ कोटी ४ लाख

विम्यापोटी होणारी संरक्षित रक्कम ः ११३८.१३,२० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com