Crop Insurance : बीड जिल्ह्यात चार लाख हेक्टरवर विमा कवच

Crop Protection : सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ योजना यंदा बंद केल्याने शेतकऱ्यांकडून पिकांचे विमा संरक्षण करण्याचा सहभाग अत्यल्प राहील, असा अंदाज होता.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Beed News : सरकारने ‘एक रुपयात पीकविमा’ योजना यंदा बंद केल्याने शेतकऱ्यांकडून पिकांचे विमा संरक्षण करण्याचा सहभाग अत्यल्प राहील, असा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेत उत्साहात सहभाग नोंदवला आहे.

या हंगामात ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील तब्बल १० लाख १९ खात्यांवरील पिकांना शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. आतापर्यंत चार लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

मागच्या दोन वर्षांत शेतकऱ्यांचा विमा हप्ता सरकारने भरल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘एक रुपयात विमा’ ही योजना राबविण्यात आली होती. त्यामुळे २०२३ व २०२४ या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १७ लाखांहून अधिक खात्यांवरील पिकांना विमा संरक्षित केले आहे. यंदा ही योजना बंद झाली, तरीदेखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पिकांसाठी विमा संरक्षण निवडले आहे, ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.

यावर्षी शेतकऱ्यांना स्वतःचा विमा हप्ता भरावा लागला, त्यामुळे निश्‍चितच मागच्या वर्षीपेक्षा आठ लाख खात्यांवरील पीकविमा संरक्षण कमी झाले. परंतु, १० लाखांहून अधिक खात्यांवरील पिकांचे विमा संरक्षण ही बाबही निश्‍चितच शेतकऱ्यांसाठी सकारात्मक मानली जात आहे. दरम्यान, पीकविमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. आता सरकारने या योजनेसाठी मुदतवाढ दिली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा निरुत्साह

शेवटच्या मुदतीत पीकविमा पोर्टल काही काळासाठी बंद पडले होते. सायंकाळी साडेपाचपर्यंत ही अडचण राहिली. तरीही शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ‘एक रुपयात विमा’ या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर काही तांत्रिक त्रुटी आणि बोगस विमा प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा यामध्ये बदल केला. मात्र, शेतकऱ्यांनी यंदाही भरवसा ठेवत स्वतः पुढाकार घेतला, हे उल्लेखनीय आहे.

मागील वर्षी राज्य सरकारने विमा कंपनीला १७ लाख शेतकऱ्यांच्या कवचासाठी ७९० कोटी २३ लाख रुपयांची रक्कम दिली होती. यंदा ही रक्कम थेट शेतकऱ्यांनी भरल्याने योजनेचे स्वरूप बदलले आहे.

तालुकानिहाय सहभाग

(कंसात पीकविमा संरक्षणाचे क्षेत्र)

शिरूर कासार ५४६०९ (८९१३८)

अंबाजोगाई १०३२०२ (७९०९९)

आष्टी २२९९९७ (७९०१९)

बीड २४५२४० (१४४४६४)

धारूर ८२६६६ (५४३८५)

गेवराई २९६५९९ (१७१२६५)

माजलगाव १०२००६ (६२२४७)

परळी १११३०७ (८३४३९)

पाटोदा १३३५६१ (६२३४०)

वडवणी १३२९७१ (३५२२२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com