108 Ambulance : मानाच्या दहा पालख्यांतील भाविकांना १०८ च्या १०० रुग्णवाहिका देणार सेवा

Ashadhi Wari Health Service : काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकार ग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे.
Palakhi Sohala 2025
Palakhi Sohala 2025Agrowon
Published on
Updated on

Pandharpur News : आषाढीवारीसाठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी शासनाचा १०८ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे यंदा वारीसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. या वर्षी प्रथमच १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत.

काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकार ग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे. यंदा आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व चालक सज्ज राहणार असून, त्यांच्याजवळ अत्यावश्यक औषधाचा मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे.

देहू ते पंढरपूर (जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज), आळंदी ते पंढरपूर (संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज), सासवड ते पंढरपूर (संत श्री सोपानकाका महाराज) आणि इतर सात मानाच्या पालख्यांबरोबर १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली.

Palakhi Sohala 2025
Ashadhi Wari 2025 : आषाढी यात्रेसाठी ५२०० विशेष बसेस

तसेच आरोग्य विभागाने या वर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत ‘समारिटन’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. अॅपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार.

Palakhi Sohala 2025
Ashadhi Wari 2025 : अश्व धावता रिंगणी, नाचे विठू काळजात

यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे. ‘समारिटन’ हे अॅप शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे.

या अॅपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही, तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com