Kunbi Records : कुणबींच्या ६० हजार नोंदींपैकी पाच हजारांना दाखले

Maratha Reservation Update : सोलापुर जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ४७२ कुणबी मराठाच्या नोंदी आढळल्या आहेत.
Kunbi Record
Kunbi RecordAgrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ४७२ कुणबी मराठाच्या नोंदी आढळल्या आहेत. नोंदी मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत, परंतु आतापर्यंत केवळ ५ हजार २७७ कुणबी दाखल्यांचेच वाटप झाले आहे.

सापडलेल्या नोंदीच्या दहा टक्केही दाखले अद्याप जिल्ह्यातील मराठा समाजाला मिळाले नसल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यभरातील कुणबी नोंदीचा शोध घेण्यात आला आहे. या शोध मोहिमेत आतापर्यंत ६० हजार नोंदी सापडल्या आहेत.

Kunbi Record
Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा अव्वल
जिल्ह्यात आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी कुणबी दाखला मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी ९७ टक्के व्यक्तींना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रलंबित अर्जाचीही संख्या कमी आहे.
कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी
Kunbi Record
Teachers Role : मतदारांच्या जाणीव जागृतीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
जिल्ह्यात नोंदी आढळल्या आहेत, परंतु आढळलेल्या नोंदीपासून ते कुणबी दाखला काढण्यापर्यंतची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ आहे. या प्रक्रियेत अनेक ठिकाणी पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. एका प्रमाणपत्रासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत विविध टप्प्यांवर मागणी होत असल्याने शेतकरी, शेतमजूर एवढी रक्कम कोठून आणणार? ज्यांच्या नोंदी आढळल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाने शिबिर घ्यावे.
माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज

आकडे बोलतात

आढळलेल्या नोंदी ६० हजार ४७२

स्कॅनिंग केलेल्या नोंदी ६० हजार ४६०

संकेतस्थळावर अपलोड नोंदी ४० हजार ८५२

कुणबी दाखल्यासाठी प्राप्त अर्ज ५ हजार ५८९

वाटप झालेले कुणबी प्रमाणपत्र ५ हजार २७७

कुणबीचे नामंजूर अर्ज ५२

कुणबीचे प्रलंबित अर्ज २६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com