Kunbi Record : कुणबी नोंदीचा शोध युद्धपातळीवर करावा

Maratha Reservation : मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली.
Dr. Rajesh Deshmukh
Dr. Rajesh DeshmukhAgrowon
Published on
Updated on

Pune News : जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुरावे शोधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत झाली.

बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच महानगरपालिका, सहकार विभाग, पुरातत्त्व विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘कुणबी नोंदी शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करावी व त्याच पद्धतीने विविध विवरणपत्रात अहवाल सादर करावा. १९४८ पूर्वीची आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील नोंदींची माहिती देण्यात यावी.

नोंदी घेण्यासाठी तालुका स्तरावरही समित्यांची स्थापन करण्यात आली असून, याबाबतच्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेण्यात यावा. झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर आठवड्यात न्या. शिंदे समितीला पाठविण्यात येणार आहे.

Dr. Rajesh Deshmukh
Kunbi Certificate : सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत : नारायण राणे

बहुतेक नोंदी मोडी लिपीत असल्याने त्या तपासण्यासाठी पुराभिलेख संचालनाकडून प्रशिक्षित व्यक्तींचे सहकार्य घेण्यात यावे, प्रमाणपत्र देताना अशा व्यक्तीचे प्रमाणपत्र लक्षात घेतले जाते. १३ प्रकारच्या विविध कागदपत्रांच्या आधारे ही तपासणी करावयाची आहे. तपासलेल्या नोंदींची माहिती संकेतस्थळावर टाकून न्या. शिंदे समितीलाही पाठवायची आहे.

त्यामुळे संबंधित विभागांनी या कामासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. मागासवर्गीय आयोगाकडून माहिती मागविल्यास तातडीने उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा नियंत्रण कक्षात संबंधित विभागांनी आपला एक अधिकारी तालुक्याशी समन्वय करण्यासाठी नियुक्त करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

Dr. Rajesh Deshmukh
Maratha Kunbi Certificate : नांदेडला मराठा कुणबीबाबत पुराव्याचा स्वीकार

१२ हजार २९४ प्रमाणपत्रांचे वितरण

गेल्या १० महिन्यांत कुणबी नोंदी असलेल्या १२ हजार २९४ व्यक्तींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. एकूण प्राप्त १२ हजार ९११ अर्जांपैकी ४६० अर्ज प्रलंबित असून, १५७ अर्ज नाकारण्यात आले आहे. या कामासाठी १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे लक्षात घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. तालुका स्तरावर यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

तेरा प्रकारची कागदपत्रे तपासण्यात येणार

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १३ विविध प्रकारची कागदपत्रे तपासण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क-पत्रक, कूळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन १९५१, नमुना नं. ०१ हक्क नोंद पत्रक, नमुना नं. ०२ हक्क नोंद पत्रक आणि सातबारा उतारा हे महसुली अभिलेखे तपासण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com