Organic Farming: जमीन सुपीकतेसाठी कर्ब : नत्राचे प्रमाण महत्त्वाचे

Soil Fertility: जमिनीच्या सुपीकतेसाठी कर्ब आणि नत्राचे संतुलन अत्यंत महत्त्वाचे आहे. सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास मातीचा पोत सुधारतो, पोषणतत्त्वांचा पुरवठा वाढतो आणि पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
Soil Fertility
Soil FertilityAgrowon
Published on
Updated on

Soil Health: जमिनीची सुपीकता मुख्यत्वेकरून पिकांना अन्नद्रव्य पुरवठा उपलब्ध करून देण्यावर अवलंबून असते. जमिनीतून नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना होतो.त्यामुळे ही अन्नद्रव्ये जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असावीत. पुनर्चक्रीकरणात जमिनीतील कर्ब: नत्र प्रमाण हे मुख्य म्हणजे तापमान, वातावरण, ओलावा आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर अवलंबून असते.

शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष कुजविणे हा सेंद्रिय पुनर्चक्रीकरणचा अविभाज्य आहे. पिकांची काढणी केल्यानंतर शेतामध्ये पिकांचे अवशेष भरपूर प्रमाणात उरतात. त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारीची धसकटे, गव्हाचे काड आणि इतर तृणधान्याचे अवशेष किंवा पिकांची काढणी केल्यानंतर शेतामध्ये त्यांना कुजविणे आणि खनिजीकरण करणे शक्य आहे. यासाठी ४ मिटर x२ मिटर x१ मिटर आकारमानाचा खड्डा करावा. या खड्ड्यात शेतातील उपलब्ध मातीचा पहिल्यांदा १५ सेंटिमीटर जाडीचा थर भरावा. त्यावर शेणाचे पाणी शिंपडावे. त्यानंतर शेणाचा ५ सेंटिमीटर जाडीचा थर द्यावा.

Soil Fertility
Soil Carbon : संवर्धित शेतीने जमिनीचा पोत कसा सुधारावा?

या थरानंतर त्यावर एक किलो स्फुरद खत पसरवावे. अशा प्रकारे खड्डा भरण पद्धत जमिनीपासून पाच सेंटिमीटर उंचीपर्यंत करावी. त्यावर मातीमिश्रित शेणाचे सारवण करून तसेच कुजण्यासाठी सोडून द्यावे. पाच आठवड्यानंतर खड्ड्यातील घटकांची उलथापालथ करावी. मोकळ्या वातावरणात घटक कुजवावेत. हे खत साधारणपणे पाच महिन्यात तयार होऊन वापरात येऊ शकते. असे पुनर्चक्रीकरण आपण शेतावर चांगल्या रीतीने करू शकतो.

पुनर्चक्रीकरणात कर्ब : नत्र प्रमाण महत्त्वाचे

जमिनीची सुपीकता मुख्यत्वेकरून पिकांना अन्नद्रव्य पुरवठा उपलब्ध करून देण्यावर अवलंबून असते. जमिनीतून नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकांना होतो.त्यामुळे ही अन्नद्रव्ये जमिनीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असावीत.

नत्र हे जमिनीत सेंद्रिय स्वरूपात उपलब्ध असते. सेंद्रिय नत्राचे रूपांतर उपलब्ध नत्रातून नंतर ते पिकास मिळते. म्हणूनच जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब : नत्र प्रमाण १२:१ ते २०:१ या मर्यादेपर्यंत असू शकते. सर्वसाधारणपणे हे प्रमाण १०:१ ते १२:१ असणे चांगले असते.

पुनर्चक्रीकरणात जमिनीतील कर्ब: नत्र प्रमाण हे मुख्य म्हणजे तापमान, वातावरण, ओलावा आणि जमिनीचा प्रकार या बाबींवर अवलंबून असते.

जर वातावरण उष्ण, दमट असेल तर कर्ब : नत्र प्रमाणाचे संतुलन हे शुष्क व अतिशुष्क तसेच अतिशीत हवामानापेक्षा संतुलित असते. हे प्रमाण सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया आणि जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंच्या क्रियेवर सतत बदलत असते.

वातावरण उष्ण,दमट असेल तर कुजण्याची क्रिया जलद होते. याउलट अतिशीत वातावरणात हीच क्रिया मंदावते, जिवाणूंचे कार्य नीट होऊ शकत नाही. जमिनीत ओलावा टिकून राहणे हे सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या क्रियेला आवश्यक आहे. ओलावा भरपूर असल्यास सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.

Soil Fertility
Soil Health : माती हेच शेतीतील खरे भांडवल ; तिचे आरोग्य जपा

सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे

स्फुरद आणि पालाश : सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.

जमिनीचा सामू : सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

क्षारांच्या कणांची अदलाबदल : सेंद्रिय खतांमुळे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती २० ते ३० टक्यांनी वाढते. त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते. झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.

कर्बाचा पुरवठा : कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमिनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करुन देतात.

सेंद्रिय खतांचा परिणाम : सेंद्रिय खतांमुळे जमिनीचे तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरुन ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे, कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते.

सुपर कम्पोस्ट खत

रासायनिक खताच्या तुलनेत कम्पोस्ट खतातील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असते. हे प्रमाण वाढविण्याचे विशेषतः स्फुरदाचे प्रमाण वाढविण्यासाठी ४ मीटर × २ मीटर × १ मीटर आकाराच्या खड्यातील घटकामध्ये प्रत्येक थरात १० ते १५ किलो सुपर फॉस्फेटचा थर देणे फायदेशीर आहे. यामुळे कुजण्याची क्रिया लवकर होते. त्याबरोबर स्फुरद, नत्र वाया जाण्याचे प्रमाण कमी होते,कम्पोस्ट खताचा दर्जा सुधारतो.

कम्पोस्ट खत निर्मिती

४ मीटर × २ मीटर × १ मीटर आकाराच्या खड्यात कंपोस्ट खत चांगल्या प्रतीचे होण्यासाठी वापरण्यात येणारा काडीकचऱ्यामध्ये शेण, मूत्र चांगल्या प्रकारे मिसळावे. यामुळे खताची प्रत चांगली होते, ते जलद कुजण्यास मदत होते.

तूर, कापसाच्या पऱ्हाट्या, धसकटे खड्यात भरावयाची असतील तर ते भरण्यापूर्वी त्याचे लहान तुकडे केले तर लवकर कुजतात.

कार्बन आणि नत्राचे प्रमाण अधिक असणारे सेंद्रिय पदार्थ उदा. गव्हाचे काड, भाताचे तणीस, भुईमुगाची टरफले इत्यादीपासून करावयाचे असेल तर प्रत्येक थरात गोठ्यातील साठलेल्या मूत्राचा हलका शिडकावा करावा किंवा हे शक्य नसेल तर युरिया किंवा अमोनियम सल्फेटचे १.५ ते २.५ टक्के तीव्रतेचे द्रावण शिंपडावे, जेणेकरून त्यातील नत्राचे प्रमाण वाढून खत लवकर तयार होईल. (१०० किलो काडीकचऱ्यासाठी १५ ते २५ ग्रॅम युरिया किंवा अमोनियम सल्फेटचे द्रावण शिंपडावे.)

कम्पोस्ट लवकर कुजण्यासाठी त्यात नेहमी ओलावा राहील याची काळजी घ्यावी.

- डॉ. पपिता गौरखेडे,

८००७७४५६६६

(सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com