Soil Fertility: जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय खते

Organic Farming: दर्जेदार पीक उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य ढासळत आहे. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. आनंद गोरे

Soil Health: जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जिवाणू खतांचा वापर, आंतरपीक पद्धती, शेणखत, कंपोस्टखत, हिरवळीच्या खतांचा वापर आदी उपायांचा अवलंब करता येतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य राखले जाऊन उत्पादन खर्चात देखील बचत होते.

जिवाणू खते

एकदलवर्गीय पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, द्विदल वर्गीय पिकांसाठी रायझोबियम, रायझोफॉस, तसेच स्फुरद, पालाश, जस्त या विद्राव्य खतांचा वापर करावा.

आंतरपीक पद्धती

सेंद्रिय शेतीमध्ये मुख्य पिकासोबत द्विदलवर्गीय आंतरपिकांचा समावेश केल्यास मुख्य पिकास व त्यापुढील पिकांना फायदा होतो. त्यामुळे जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. उदा. सोयाबीन अधिक तूर, कापूस अधिक तूर किंवा सोयाबीन इत्यादी.

Agriculture
Soil Fertility : सुपीकतेसाठी नॅनो बायोचार

शेणखत

शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत आहे.

कंपोस्ट खत निर्मितीच्या पद्धती

पीक काढणीनंतर शेतात उरलेले अवशेष, ग्रामीण व नागरी भागातील निर्माण सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा यापासून सूक्ष्म जिवाणूंच्या मदतीने कुजवून कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खत निर्मितीसाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. त्यात ढीग पद्धत, बेंगलोर पद्धत, नाडेप पद्धत, गांडूळखत यांचा समावेश होते.

ढीग पद्धत इंदोर पद्धत

साधारण ६ फूट रुंद, ५ ते ६ फूट उंच व आवश्यकतेनुसार लांबी ठेवून जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये या पद्धतीद्वारे जमिनीवर ढीग तयार करून खतनिर्मिती केली जाते.

Agriculture
Soil Fertility: जमिनीची सुपीकता हाच शेतीचा पाया

बेंगलोर पद्धत

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये या पद्धतीने कंपोस्ट खत तयार केले जाते. या पद्धतीमध्ये जमिनीत ३ फूट खोल खड्डा घेऊन लांबी व रुंदीच्या उपलब्धतेनुसार पीक अवशेष टाकले जाते. त्यानंतर ही खते तयार केली जातात.

नाडेप पद्धत

या पद्धतीमध्ये जमिनीवर ३ फूट उंच, ६ फूट रुंद व लांबी आवश्यकतेनुसार ठेवून विटाचे साहाय्याने बांधकाम करून कंपोस्टखत तयार केले जाते.

गांडूळखत

विटाचे बांधकाम करून किंवा जमिनीमध्ये खड्डा करून गांडूळखत तयार करता येते. त्यामध्ये पिकांचे अवशेष, पालापाचोळा, शेण, माती, उर्वरित पालेभाज्या, बारीक गवत करून गांडूळ खत तयार केले जाते.

हिरवळीच्या खताचे प्रकार

हिरवळीची पिके शेतात वाढवून ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडली जातात. त्यापासून उत्तम दर्जाचे खत तयार होते. त्यासाठी ताग, गवार, मूग, मटकी, उडीद, लसूणघास, बरसीम, बोरु, धैंचा, चवळी इत्यादी हिरवळीची पिके फायदेशीर ठरतात. याशिवाय हिरवळीच्या खताचे पीक शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने मशागतीवेळी जमिनीत गाडली जातात. उदा. गिरीपुष्प, सुबाभूळ, शेवरी, करंज इत्यादी.

- डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६

(सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com