Organic Fertilizer Stock : मोर्शीत सेंद्रिय खतांचा सहा लाखांचा साठा जप्त

Bogus Fertilizer : बोगस असल्याच्या सशंयावरून कृषी विभागाच्या पथकाने एका घरातून तब्बल ६०० बॅग सेंद्रिय खताचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या या खताची किंमत प्रतिबॅग एक हजार रुपयांप्रमाणे सहा लाख रुपयांच्या घरात आहे.
Organic Fertilizer Stock
Fertilizer Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : बोगस असल्याच्या सशंयावरून कृषी विभागाच्या पथकाने एका घरातून तब्बल ६०० बॅग सेंद्रिय खताचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या या खताची किंमत प्रतिबॅग एक हजार रुपयांप्रमाणे सहा लाख रुपयांच्या घरात आहे.

प्रयोगशाळेच्या अहवालात खताचा दर्जा योग्य मिळून आला असला तरी किरकोळ परवाना नसल्याने याप्रकरणी सांगली येथील मार्केटिंग करणाऱ्या कंपनीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवरखेड (ता. मोर्शी) येथे लोणी मार्गावर असलेल्या शंकर पाचारे यांच्या घरात सेंद्रिय खताचा अवैध साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्याआधारे मोर्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल चौधरी, गुण नियंत्रण तंत्र अधिकारी रमेश जानकर, संजय पाटील, जिल्हा कृषी अधिकारी अजय तळेगावर यांनी ८ जानेवारी रोजी या घरावर छापेमारी केली.

Organic Fertilizer Stock
Organic Fertilizer : पारंपरिक सेंद्रिय खत शेतीला वरदान

या वेळी घरात तब्बल ६०० बॅग सेंद्रिय खताचा साठा मिळून आला. घरमालकाच्या वतीने तेथे उपस्थित मनोज शंकर पाचारे यांना खत साठ्याबाबत विचारणा केली असता त्यांनी या दोन रुम अंजनगावसूर्जी येथील नीलेश श्रीकृष्णराव भेले यांना प्रतिमहिना दोन हजार रुपये प्रमाणे भाड्याने दिल्याचे सांगितले. त्यासाठी लेखीऐवजी तोंडी करारनामा करण्यात आला होता, असेही श्री. पाचारे यांनी सांगितले.

त्यानंतर नीलेश भेले यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे खत विक्रीचा कोणताही परवाना मिळून आला नाही. त्यासमवेत खतांचे उत्पादन करणारी कंपनी ग्लोबल पॉली ॲग्रो (कोल्हापूर) तसेच मार्केटिंग कंपनी मिलेनीया ॲग्रो लाईफ (सांगली) यांना पत्र पाठवित खताच्या साठ्याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले.

मार्केटिंग कंपनीने हा खत साठा आपलाच असल्याची कबुली दरम्यान दिली. परंतु त्यांच्याकडे केवळ घाऊक विक्री परवाना होता. त्यानंतरही त्यांनी किरकोळ विक्री केल्याचे सिद्ध झाल्याने अखेरीस १४ दिवसानंतर शुक्रवारी (ता. २४) याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली.

प्रयोगशाळेच्या पृथ्थकरणात यात खतातील एक नमुना पीएचमध्ये फेल आढळून आला आहे. साडेसहा ते साडेसात या दरम्यान पीएच असला पाहिजे. परंतु खतातील एका नमुन्याचे घटक कमी असल्याचे निष्कर्ष प्रयोगशाळेच्या अहवालाअंती समोर आले.

Organic Fertilizer Stock
Organic Fertilizers : भात, गहू पिकांसाठी सेंद्रिय खताच्या पॅलेट

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

याप्रकरणी राहुल चौधरी यांच्या तक्रारीवरून मिलेनिया ॲग्रो लाईफ सिग्नेचर (सांगली मिरज रोड, सांगली), नीलेश जुहरमल पोरवाल (सांगली), परेश पारसमल पोरवाल (फ्लॅट क्र. ४०१, निर्मिती टॉवर, मिरज सांगली), अप्पासाहेब विष्णू थोरात (सिग्नेचर बिल्डिंग, मिरज, सांगली), नीलेश कृष्णराव भेले (अंजनगावसूर्जी, अमरावती) अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रव्यवहार, जबाबदारी निश्‍चिती तसेच प्रयोगशाळेचा अहवाल या कारणामुळे कारवाईनंतर तक्रारीसाठी १४ ते १५ दिवस लागले. रिटेल परवाना नसताना मार्केटिंग करणाऱ्या सांगलीच्या कंपनीने किरकोळ विक्री केली. त्यामुळे याप्रकरणी पोलिस तक्रार करण्यात आली. या प्रकरणात सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
- राहुल चौधरी, कृषी अधिकारी, पंचायत समिती, मोर्शी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com