Organic Farming : सेंद्रिय शेती सध्याच्या दृष्टीने फायदेशीर ः बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करून सर्वांनीच आधुनिक पद्धतीने शेती करावी व अधिक उत्पन्न घ्यावे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Nagar News : आताच्या तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण सेंद्रिय शेती फायदेशीर असून, त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होते आणि उत्पादन खर्चात बचत होते, असे मत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सोनोशी (ता. संगमनेर) येथे कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘कृषी विज्ञान पुरस्कार’ प्रदान सोहळा कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते.

प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू पुरस्कारार्थी डॉ. शरद गडाख, तुकाराम गुंजाळ, काव्या दातखिळे, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, लक्ष्मण कुटे, सुभाष सांगळे, गणपत सांगळे, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब गिते, कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. एल. के. गिते, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते उपस्थित होते.

Organic Farming
Organic Farming : प्रयोगशीलतेतून साधली आर्थिक प्रगती

थोरात म्हणाले, की शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करून सर्वांनीच आधुनिक पद्धतीने शेती करावी व अधिक उत्पन्न घ्यावे. त्यासाठी स्व. कारभारी दादा गिते यांचा आदर्श घ्यावा.

Organic Farming
Organic Farming : सांगली जिल्ह्यात एका वर्षात होणार १३० सेंद्रिय गट स्थापन

कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे ''कृषी विज्ञान पुरस्कार’ प्रेरणादायी असून ते राबवीत असलेले शेतीविषयक उपक्रम स्तुत्य आहेत. यानिमित्ताने आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे शेती आणि शेतकरी या विषयावर व्याख्यान पार पडले.

या वेळी दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. स्व. कारभारी दादा गिते यांच्या स्मृतिस्थळी आमदार बाळासाहेब थोरात सहीत मान्यवरांनी अभिवादन केले. कृषी क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्याबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख, आदर्श शेतकरी तुकाराम गुंजाळ, शेती निगडित सेवांसाठी काव्या ढोबळे - दातखिळे यांना कृषी विज्ञान पुरस्कार देऊन या वेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक मोरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत घुले यांनी केले. हरिभाऊ गिते यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com