Orange Market
Orange MarketAgrowon

Orange Trade Fraud : चांदूरबाजारमध्ये संत्रा व्यापाऱ्याची ३२ लाखांची फसवणूक

Orange Market : चांदूरबाजार तालुक्यात शिरजगावबंड येथील संत्रा व्यापाऱ्याची संत्राविक्री व्यवहारात ३२ लाख १२ हजार रुपयांनी फसवणूक झाली.
Published on

Amaravati News : चांदूरबाजार तालुक्यात शिरजगावबंड येथील संत्रा व्यापाऱ्याची संत्राविक्री व्यवहारात ३२ लाख १२ हजार रुपयांनी फसवणूक झाली. रफिक खान नूर खान (वय ४५, रा. ताजनगर, चांदूरबाजार) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

रफिक खान हे संत्रा व्यापारी असून, त्यांनी शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचा संत्रा माल खरेदी केला होता. त्यानंतर एजंट श्यामसुंदर याच्या माध्यमातून हा माल संशयित जय जगन्नाथ सहा (रा. श्रीपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल) यांना ५७ लाख ३ हजार ३९४ रुपयांची मोसंबी व ६५ लाख ३३ हजार ४५६ रुपयांचा संत्रा, असा एकूण १ कोटी २२ लाख ३६ हजार ८५० रुपयांचा माल विकला.

Orange Market
Orange Farming : वाशीमच्या शेतकऱ्यांची संत्रा उत्पादकतेत झेप

त्यापैकी वेगळ्या तारखांना संशयित जय जगन्नाथ सहा (वय ४०) व एजंट श्यामसुंदर बालिक (दोघेही रा. श्रीपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल) या दोघांकडून ९० लाख २२ हजार ६१० रुपये मिळाले.

Orange Market
Sweet Orange Market : मोसंबीची आवक जेमतेम; दर दबावातच ; छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारांतील स्थिती

उर्वरित ३२ लाख १४ हजार २४० रुपये संशयितांना सतत मागणी करूनसुद्धा देण्यास दोघांनी टाळाटाळ केली. आपली ३२ लाख १२ हजार रुपयांनी फसवणूक केली, असा त्यांचा आरोप आहे.

एजंट श्यामसुंदर बालिक यांच्या पावतीवर नमूद केल्याप्रमाणे रफिक खान यांनी हा माल निर्धारित ठिकाणी पाठविला होता, असे रफिक खान नूर खान यांनी चांदूरबाजार ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com