Orange Growers : संत्रा उत्पादकांना पावसाची धास्ती

Rain Fear : सद्यःस्थितीत काही शेतकऱ्यांची संत्राबाग खाली झाली असून, त्यांनी दुसऱ्या बहाराच्या संत्र्याकरिता बागांना ताण देण्यासाठी सोडले होते.
Orange Fruit Fall
Orange Fruit FallAgrowon
Published on
Updated on

Amravati News : पावसाळ्याप्रमाणे सतत तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे संत्राउत्पादक शेतकऱ्यांची धास्ती वाढवली असून होणाऱ्या नुकसानीचा अंत उरणार नाही, म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शासनाकडूनच यावर मार्ग काढण्याची अपेक्षा शेतकऱ्यात व्यक्त होत आहे.

सद्यःस्थितीत काही शेतकऱ्यांची संत्राबाग खाली झाली असून, त्यांनी दुसऱ्या बहाराच्या संत्र्याकरिता बागांना ताण देण्यासाठी सोडले होते. तर अनेक शेतकऱ्यांच्या बागांतील संत्राफळांची तोड बाकी आहे. अशा परिस्थितीत अचानकपणे मागील तीन दिवस अवकाळी पाऊस कोसळला. त्याचा फायदा कोरडवाहू पिकांना जरी होत असला तरी मात्र संत्र्यासारख्या पिकाला जबरदस्त फटका बसला आहे.

Orange Fruit Fall
Crop Damage : पावसाचा ३० हजार हेक्टरला फटका

तोडलेल्या संत्राफळांमध्ये आता अळ्या पडण्यास सुरवात झाली आहे. जी फळे झाडावर आहेत त्यांनासुद्धा पावसाचा मारा बसल्याने खराब होण्याच्या मार्गावर आहेत. नैसर्गिक आपत्तीत संत्रा पिकांचे नुकसान झाले तर त्यांना पीकविमा कंपनीद्वारे नुकसानभरपाईची तरतूद शासनाने केली आहे.

Orange Fruit Fall
Banana Crop Damage : खानदेशात वादळी पावसात केळी बागा भुईसपाट

ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या हिश्‍शाचे १२ हजार रुपये भरावे लागतात. त्यावर केंद्र सरकारकडून ३२ हजार रुपये हिस्सा देण्यात येतो. तर राज्य सरकारकडून १२ हजार रुपये, असे एकूण ५६ हजार रुपये विमा कंपनीत जमा करण्यात आल्यावर नुकसानग्रस्त फळ बागायतदारांना हेक्टरी ८८ हजार रुपयांची मदत मिळते. परंतु हा पीकविमा हवामान आधारित असल्यामुळे तो यावर्षी नामंजूर करण्यात आला आहे.

मोठे नुकसान

मागील वर्षी एवढे नुकसान झाल्यावर शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात बत्तीस हजार रुपये अनुदानाची रक्कम वळती करणे जरूरीचे होते. परंतु शासन सदरची रक्कम पीकविमा कंपन्यांना देताना शेतकऱ्यांचा काहीच विचार करीत नसल्याचे दिसून येते. सद्यःपरिस्थितीत अवकाळी पावसामुळे जे फळबागायतदारांचे नुकसान झाले त्यावरून हा आकडा किती कोटी रुपयांवर जाईल याचा अंदाजसुद्धा लावणे कठीण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com