Fruit Crop Insurance : नांदेडला पुनर्रचित फळपीकविमा योजना लागू

Crop Insurance Scheme : पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा मृग बहर ही योजना चिकू, पेरू, मोसंबी, लिंबू व सीताफळ या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडलांमध्ये राबविण्यात येत आहे.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा मृग बहर ही योजना चिकू, पेरू, मोसंबी, लिंबू व सीताफळ या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडलांमध्ये राबविण्यात येत आहे. ही योजना २०२५-२६ या वर्षासाठी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी लि. या कंपनीमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. यात मृग बहरासाठी विमा हप्ता मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित पाच हजार रुपये.

लिंबू पिकाची विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता नियमित चार हजार रुपये तर सीताफळ फळासाठी विमा संरक्षण ७० हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा ३ हजार ५०० रुपये तर चिकू फळासाठी विमा संरक्षण ७० हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता ४ हजार ९०० रुपये तर पेरू फळासाठी विमा संरक्षण ७० हजार रुपये तर भरावयाचा विमा हप्ता हा साडेतीन हजार रुपये आहे.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसह शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टलवर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Variety : निवड फळझाडांच्या जातींची

त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सात-बारा, ८ अ उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल, कॉमन सर्विस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील. शासनाच्या ११ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजना शेतकरीपूरक करा

त्या अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग व आंबिया बहर २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीकविमा काढण्यात आलेला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून घेऊन उपरोक्त अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.

माहितीसाठी संपर्क साधावा

मृग बहर अधिसूचित महसूल मंडलांअंतर्गत अधिसूचित फळपिके, तालुके, अधिसूचित महसूल मंडले, पीकविमा भरण्याची अंतिम तारीख, विमा संरक्षण प्रकार, विमा संरक्षण कालावधी याबाबतच्या माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com