
Buldana News : शेतकरी उत्पादक कंपन्या व त्यांचे संघटन करून द्राक्षाप्रमाणेच संत्रा पिकाची परदेशात विक्री व व्यवस्थापन व्हावे, या संकल्पनेतून परिसरातील शेतकऱ्यांना संत्रा लागवड तंत्रज्ञान तसेच विक्री व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जाईल.
शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून अधिकाधिक क्षेत्रावर तंत्रशुद्ध पद्धतीने संत्रा लागवड वाढवावी. सह्याद्री फार्म्स यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करेल, असे आश्वासन विलास शिंदे यांनी दिले.
डोणगाव (ता. मेहकर) येथे शुक्रवारी (दि. ९) झालेल्या संत्रा उत्पादक संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी (नाशिक) आणि डोणगाव परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सह्याद्री फार्म्सचे चेअरमन श्री. शिंदे, संत्रा पीकतज्ज्ञ सचिन वाळूज, मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी विजय सरोदे, कृषी पर्यवेक्षक विठ्ठल धांडे उपस्थित होते.
या वेळी तज्ज्ञ प्रशिक्षक संजय वाळूज यांनी पीपीटीच्या माध्यमातून संत्रा लागवडीपूर्वीचे व्यवस्थापन, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याविषयी माहिती दिली. तर कृषी पर्यवेक्षक श्री. धांडे यांनी फळबाग पूर्वनियोजन व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. धांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी मानले.
या वेळी डोणगावचे कृषी पर्यवेक्षक बबन बोर्डे, कृषी सहायक दिगंबर शिंदे तसेच मेहकर तालुक्यातील विविध गावांतील संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोणगाव येथील प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी संतोष जगदेवराव आखाडे, प्रतीक आखाडे, भारत विढोळे, प्रीतेश डहाके, सूरज दिनोरे, आशीष आंबेकर, गजानन आखाडे यांनी विशेष पुढाकार घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.