Grape Farming : द्राक्ष बागेत शास्त्रीय पद्धतीने प्लॅस्टिक कव्हरचा योग्य वापर

Grape Advisory : द्राक्ष बागेवर लावल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकबाबत अजून आवश्यक तेवढी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. किंबहुना, वेगवेगळ्या द्राक्ष विभागांमध्ये हवामानाशी निगडित बागेतील धोक्याची कारणे वेगवेगळी आहेत.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

डॉ. एस. डी. सावंत

Grape Plastic Cover Use : मागील काही वर्षांत बदलत्या हवामानामुळे विशेषतः अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या नुकसानीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या काही बागायतदारांनी द्राक्ष बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला. निफाड भागात गारपिटीमुळे नुकसान होऊ नये म्हणून द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक कव्हरचा वापर वाढला आहे. मागील काही वर्षांत बऱ्याच बागांमध्ये प्लॅस्टिक कव्हर लावले गेले. काहींना यात यश मिळाले तर काहींना अजूनही त्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. द्राक्ष बागेवर लावल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकबाबत अजून आवश्यक तेवढी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही. किंबहुना, वेगवेगळ्या द्राक्ष विभागांमध्ये हवामानाशी निगडित बागेतील धोक्याची कारणे वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी वादळी पावसाचा धोका तर काही ठिकाणी गारपिटीचा धोका संभवतो. कुठे जास्त तापमानामुळे तर कुठे जास्त थंडीमुळे नुकसान होते.

प्लॅस्टिक कव्हर करताना...
१) बागेतील वाढीच्या कोणत्या दशेत धोके उद्‍भवतात हे सुद्धा महत्त्वाचे आहे. खरड छाटणीनंतरच्या कोवळ्या फुटीवर तर काही वेळा काढणीस तयार असणाऱ्या द्राक्ष बागेत गारपीट झालेली दिसते. अशा परिस्थितीत एकाच प्रकारचे प्लॅस्टिक आणि त्याचा वापर करण्याची पद्धती सगळीकडे अपेक्षित परिणाम करणार नाही.
२) अवेळी येणारा पाऊस किंवा गारपिटीपासून बागेला संरक्षण देण्यासाठी प्लॅस्टिक कव्हर लावले जाते. पाऊस आणि गारपीट प्रत्येक वर्षी येत नाही. सरासरी चार ते पाच लाख रुपये खर्च करून प्लॅस्टिक कव्हर लावले पण त्या वर्षी पाऊस अथवा गारपीट झालीच नाही तर पैसे वाया गेले असे काही जणांना वाटायला लागते.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष बागेत चिखलामुळे फवारणीत अडथळे

३) खरे म्हटले तर बागेवरील प्लॅस्टिक कव्हरचे वेगवेगळ्या टप्यांमध्ये वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत. म्हणूनच एवढा खर्च केल्यानंतर फक्त पाऊस आणि गारपिटीचा विचार न करता प्लॅस्टिक वर्षभर वेगवेगळ्या फायद्यासाठी कसे वापरायचे हे जास्त महत्त्वाचे आहे. याबाबतचे आमचे काही अनुभव व काही शास्त्रीय विचार माझ्या पुढील काही आठवड्यांतील सल्यामध्ये मी मांडणार आहे.
४) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही प्लॅस्टिक कव्हर बाबत काही प्रयोग केले. प्रयोगशील द्राक्ष बागायतदारांनी बागेत लावलेली काही प्लॅस्टिक कव्हर पाहिली. या अभ्यासातून काही त्रुटी समजल्या. या त्रुटी सुधारण्यासाठी काही समविचारी तज्ज्ञ आणि बागायतदारांनी एकत्र येऊन काही प्रयोग सुरू केले आहेत. त्यातील पहिल्या वर्षाचे अनुभव हाती आले आहेत. त्याबद्दल पुढील आठवड्यात सविस्तर माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, की प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने त्याचा संपूर्ण क्षेत्रांपैकी काही क्षेत्रावर प्लॅस्टिक कव्हरचा वापर करावा.

Grape Farming
Grape Farming : द्राक्ष बागेत कलम करताना घ्यावयाची काळजी

परदेशातील अनुभव ः
काही वर्षांपूर्वी मला महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या मदतीने स्पेन आणि इटली देशामधील द्राक्ष बागांना भेट देण्याची संधी मिळाली. स्पेन व इटली मध्ये काही वर्षांपर्यंत फक्त वाइन उत्पादनासाठी लागणाऱ्या द्राक्ष जातींची लागवड होती. तेथे वाहणारे थंड वारे, धुके यामुळे खाण्यासाठी लागणाऱ्या द्राक्ष जातींच्या लागवडीचा ते विचार करू शकत नव्हते. येथील शेतकऱ्यांनी खाण्यासाठी लागणाऱ्या द्राक्ष जातींची लागवड केल्यावर त्यामध्ये प्लॅस्टिक कव्हरचा वापर सुरू केला. आज हे दोन्ही देश युरोपमधील आजूबाजूच्या देशांमध्ये द्राक्ष निर्यात करतात. या विभागामध्ये खाण्यासाठी लागवड केलेल्या द्राक्ष बागेत प्लॅस्टिक आच्छादन केलेले दिसते. त्यामुळे आपण देखील हवामान बदलाचा धोका का आणि किती दिवस पत्करायचा? प्लॅस्टिक कव्हरचा वापर खर्चीक आहे. पण त्याचा वापर योग्य पद्धतीने वर्षभर केल्यास फायदेशीर होऊ शकतो.

१) मागील काही वर्षांच्या निरीक्षणावरून असे सांगता येईल, की राज्यातील काही विशेष विभाग आहेत की तेथे बागांना जास्त धोका
आहे. अशा ठिकाणाच्या बागेमध्ये प्लॅस्टिक कव्हर जास्त फायद्याचे होईल. हलक्या जमिनींचा डोंगराळ भाग जेथे जास्त करून खुरटी गवते किंवा छोटी झुडपेच वाढतात. अलीकडे अशा भागात कालवे झाल्यामुळे किंवा शेततळी तयार केल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली आहे. या भागात द्राक्ष बागा वाढल्या आहेत. या भागात वळवाचा वादळी पाऊस किंवा गारपीट होण्याची जास्त शक्यता असते. मार्च, एप्रिल महिन्यांत जेव्हा उष्णतेची लाट येते आणि दुपारी जास्त गरम होते त्या वेळी पाण्याचे बाष्पीभवन होऊन बाष्प आकाशात जाते. जास्त उष्णता ही जास्त बाष्प जास्त उंच वेगाने घेऊन जाते.

बाष्प वेगाने जितके उंच जाईल तितके जास्त थंड होऊन त्याचे पाणी किंवा बर्फात रूपांतर होते आणि त्यानंतर त्या भागात वादळी पाऊस किंवा गारपीट होते. अशा भागात थोडा कमी उंचीचा उताराचा भाग बहुदा नदी, तलाव किंवा शेततळ्याच्या जवळ असतो. तेथील बागांमध्ये निरीक्षण केल्यास लक्षात येईल, की तेथे खेळती हवा कमी प्रमाणात असते. त्यामुळे आर्द्रता जास्त होते. तसेच रोगाच्या प्रादुर्भावाची देखील शक्यता वाढते. ज्या वेळी डिसेंबर जानेवारीमध्ये थंडीची लाट येते, त्या वेळी अशा बागांमध्ये इतर भागाच्या तुलनेत तापमान फार कमी जाते. ते बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा जास्त कमी असते. अशा बागेत उकड्या किंवा तत्सम प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतात. हे सर्व धोके प्लॅस्टिक कव्हर वापरून टाळता येतील.
याबाबत पुढील आठवड्यात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com