
पुणे : मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (National Grape Research Center) अंतर्गत ॲग्री बिझनेस इनक्युबेशन केंद्राचा (एबीआय) दोन कंपन्यांसोबत तंत्रज्ञान हस्तांतराचा सामंजस्य करार झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘एबीआय’चे प्रमुख डॉ. अजय कुमार शर्मा यांनी दोन्ही कंपन्यांची माहिती देत त्यांचे भविष्यातील उद्देश तथा प्रयोजन स्पष्ट केले.
या ‘एबीआय’ केंद्राद्वारे सतत विविध उद्योजकता विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तसेच द्राक्ष फळपिकाच्या निगडित स्टार्टअप, नवउद्योजकांना विविध १० विषयांवर तांत्रिक प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येते. विशेष म्हणजे या केंद्राद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी, तसेच त्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाचेही मार्गदर्शन करण्यात येते.
यापैकीच विजयापुरा (कर्नाटक) येथील मैत्रीबला उद्यान विद्या शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासोबत ‘निर्यातक्षम बेदाणा उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर करार करण्यात आला. या शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक कृष्णाजी कंडसर, मारुती कंडसर आणि विद्याधर भावीकट्टी हे प्रसंगी उपस्थित होते.
दुसरा करार हा पुणे येथील ॲग्रीओटिक्स टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीच्या संस्थापक तथा महिला उद्योजक सौ. प्रतिभा राहुल राव यांच्या ‘काटेकोर शेती तंत्रज्ञान आधारित आधुनिक सेन्सर तंत्रज्ञान वापरून फळबागेतील रोग-किडी तथा सूक्ष्म सिंचन व्यवस्थापनासाठी विश्लेषणात्मक सेवा’ या तंत्रज्ञानासाठी करण्यात आला.
प्रसंगी सौ. प्रतिभा यांनी काटेकोर शेतीचे महत्त्व स्पष्ट करून त्यांच्या निर्माण केलेल्या उपकरणाची माहिती सांगून त्याचे भविष्यातील फायदे विशद केली. एनआरसीचे निर्देशक डॉ. आर. जी. सोमकुवर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवून दोन्ही कंपन्यांना तांत्रिक साह्याची हमी देत पुढील उद्दिष्टांसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रशांत निकुंभे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रसंगी डॉ. अनुराधा उपाध्याय, डॉ. अजय कुमार उपाध्याय, डॉ. सुजय सहा, डॉ. सोमनाथ होळकर आदी शास्त्रज्ञ उपस्थित होते. एबीआयचे रोहित पलघडमल आणि डॉ. गणेश जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.