Grape Farming : द्राक्ष बागेत चिखलामुळे फवारणीत अडथळे

Grape Pruning : सप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यापासून द्राक्ष पट्ट्यात टप्प्याटप्प्याने गोडी बहर छाटणी कामे सुरू झाली आहेत. चांदवड तालुक्यात वडनेर भैरव परिसरात छाटण्या सुरू झाल्या.
Grape Farming
Grape Farming Agrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरीस तसेच गेल्या सप्ताहात झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष बागेत चिखल होऊन ट्रॅक्टरने यंत्राद्वारे फवारणी करताना अडथळे येत आहेत. पाणी वाहून गेल्यानंतर चिखल झाल्याने गल्ल्यांमध्ये ट्रॅक्टर चिखलात अडकण्याची समस्या आहे. परिणामी कामांची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कुठलीही दराची उत्पादन व शाश्वती नसतानाही आव्हानात्मक परिस्थितीत द्राक्ष हंगामाला सामोरे जावे लागत आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यापासून द्राक्ष पट्ट्यात टप्प्याटप्प्याने गोडी बहर छाटणी कामे सुरू झाली आहेत. चांदवड तालुक्यात वडनेर भैरव परिसरात छाटण्या सुरू झाल्या. या भागात बागा फुटून घड निघाले आहेत. मात्र पावसाने दणका दिल्यानंतर डाऊनीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संरक्षणात्मक फवारण्या द्राक्ष बागेत केल्या जात होत्या. मात्र पावसाने कामकाज कोलमडले आहे.

Grape Farming
Grape Pruning : सांगली जिल्ह्यात द्राक्षफळ छाटणीची तयारी सुरू

पाऊस झाल्यानंतर गल्ल्यांमध्ये पाणी वाहत असताना ट्रॅक्टरद्वारे फवारणी यंत्र नेणे-आणण्याचे काम शक्य होते. मात्र पाणी कमी होऊन गल्ल्यांमध्ये चिखल झाल्याने पीक संरक्षण कामकाज अडचणीत सापडले आहे. बागेत ट्रॅक्टर चिखलात अडकत असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.

Grape Farming
Grape Pruning : जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली

कामात गती येऊन लवकर फवारणीत सुलभता आणण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी २०० लिटरवर फवारणी यंत्रांचा वापर करतात. मात्र यंत्रे अडकत असल्याने काही ठिकाणी दोन ट्रॅक्टर लावून फवारणी केली जात आहे. तर काही शेतकरी २०० लिटरपेक्षा कमी फवारणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून कामकाज करत आहेत.

बागा छाटल्यानंतर चांगले घड निघाले आहेत. मात्र पाऊस आल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या फवारणी सुरू आहे. मात्र, ट्रॅक्टर अडकत असल्याने कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी फवारणी थांबली आहे. मात्र रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून काही ठिकाणी ट्रॅक्टरला दुसरा ट्रॅक्टर जोडून फवारणी करण्याची वेळ आली आहे.
- बाबाजी सलादे, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com