Legislative Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचे ‘बहिष्कारास्त्र’

EVM and Markadwadi Issue : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर बोलविण्यात आलेल्या पहिल्याच विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम आणि मारकडवाडी ग्रामस्थांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कामकाजावर बहिष्कार टाकला.
Legislative Session
Legislative SessionAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर बोलविण्यात आलेल्या पहिल्याच विशेष अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम आणि मारकडवाडी ग्रामस्थांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कामकाजावर बहिष्कार टाकला.

आमदारांच्या शपथविधीसाठी बोलवण्यात आलेले या अधिवेशनावर पहिल्या दिवशी बहिष्कार टाकल्याने महायुतीच्या आमदारांना शपथ देण्यात आली. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाने बाबरी मशीद पाडल्याच्या दावा करत दिलेल्या जाहिरातीवरून समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून फारकत घेत बाहेर पडत असल्याचे जाहीर केले.

Legislative Session
Maharashtra Political News : सत्ताधारी आमदारांचा शपथविधी, विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार; ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभात्याग

महायुतीच्या १७३ आमदारांनी शपथ घेतली. तसेच समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख, तसेच माकपच्या विनोद निकोले यांनी शपथ घेतली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राजभवनात ज्येष्ठ आमदार कालिदास कोळमकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

महायुतीचे आमदार गुलाबी रंगाचे फेटे परिधान करून विधान भवनात दाखल झाले. सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताने विशेष अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अध्यक्ष कोळमकर यांनी कामकाजाला सुरुवात केली असता लगेचच मविआच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

Legislative Session
Maharashtra Government : नव्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा

आणि विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात घोषणा दिल्या. यात शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू, कैलास पाटील, अजय चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, रोहित पाटील आणि काँग्रेसचे नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदींचा समावेश होता.

शपथ घ्यावीच लागेल : अजित पवार

विरोधकांच्या ‘बहिष्कार अस्त्रा’मुळे शनिवारी केवळ महायुतीच्या आमदारांचा शपथविधी झाला. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक शब्दांत टीका केली. ‘‘लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना त्यांनी काय करायचे याचा अधिकार असतो, पण शपथ घेण्यासाठी रविवारी शेवटचा दिवस आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल, अन्यथा सभागृहाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार नाहीत,’’ असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com