Maharashtra Political News : सत्ताधारी आमदारांचा शपथविधी, विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार; ईव्हीएमच्या मुद्द्यावर सभात्याग

Maharashtra Cabinet Expansion Updates : महायुती सरकारचा शपथविधी पार पडला असून आज राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान विरोधी आमदारांनी सभात्याग करत ईव्हीएमच्या मुद्द्यावर शपथविधीवर बहिष्कार टाकला आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात महायुती सरकार सत्तेत आले असून आजपासून (ता.७) विशेष अधिवशन बोलावण्यात आले आहे. आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत आहे. दरम्यान या शपथविधीवर महाविकास आघाडीसह विरोधी आमदारांनी बहिष्कार टाकला आहे. विरोधकांनी सभात्याग केला असून विरोधी आमदार उद्या (ता.८) शपथ घेणार आहेत. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सत्ताधाऱ्यांनी यावरून विरोधकांवर टीका केली आहे.

विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव पुकारले असता सर्व आमदार बाहेर पडले. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे ४९ आमदार आज शपथ घेणार नसल्याचे जाहीर केले.

Maharashtra Political News
Markadwadi Ballot Paper Re-Voting Case : ईव्हीएमविरोधात क्रांतीचा एल्गार! मारकडवाडीला शरद पवार व राहुल गांधी जाणार, लाँग मार्चची तयारी

यावेळी आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अेक विरोधी आमदारांनी सभागृ सोडत आज शपथ घेतली जाणार नाही, अशी माहिती दिली. तसेच याआधी विरोधकांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तर शपथ न घेण्यामागे ईव्हीएमला विरोध असण्याचे कारण सांगितले. यावेळी भास्कर जाधव यांनी, सध्याचे महायुतीचे सरकार पाशवी बहुमाच्या जोरावर आले असून त्याला राज्यातील जनतेचा जनाधार नाही. यामुळे विरोध असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या शपथविधीवरील बहिष्कारवरून अजित पवारांनी टीका केली आहे. त्यांनी, ईव्हीएम बाबत बोलणे म्हणजे विरोधकांचा रडीचा डाव आहे. जनतेने महाविकास आघाडीला बहुमत दिले आहे. याआधी विरोधकांचा लोकसभेत विजय झाला. तेंव्हा ईव्हीएम चांगलं होतं. पण आता विधानसभा निवडणुकीत आमचा (महायुती) विषय झाल्याने ईव्हीएममध्ये घोळ दिसतोय का?, अशी टीका केली आहे.

Maharashtra Political News
Devendra Fadanvis : ‘शक्तिपीठ’चे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध; संघर्ष समिती आक्रमक

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी निवडणूक आयोगालाच आव्हान दिले आहे. यावेळी दोघांनी आयोगाने मतपत्रिकेवर निवडणूक घेतल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ. मतपत्रिकेवरील निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे. यावेळी जानकर यांनी, ईव्हीएमच्या विरोधासाठी मारकडवाडी रविवारी शरद पवार येणार आहेत. आम्ही मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी आग्रही असून गरज पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले आहे.

अशीच घोषणा आमदार सुनील यांनी केली असून आपणही मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देवू अशी भूमीका घेतली आहे. तर आपला विजय फक्त १६ हजारांच्या मताधिक्याने झाला असून मताधिक्याने किमान ४० ते ५० हजार मिळायला हवे होते. यामुळे हा निकाल विक्रोळीतील जनतेलाच मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com