Parliament Adjourned: विरोधकांनी सरकारला आणले जेरीस; संसदेच कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प

VoterList Controversy: संसदेच कामकाज आजही ठप्प झालं होत. कामकाज सुरू होताच विरोधकांच्या घोषणांनी दोन्ही सभागृहे दणाणली. ऑपरेशन सिंदुर आणि बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक आहेत.
Parliament Adjourned
Parliament AdjournedAgrowon
Published on
Updated on

Parliament Updates: संसदेच कामकाज आजही ठप्प झालं होत. कामकाज सुरू होताच  विरोधकांच्या घोषणांनी दोन्ही सभागृहे दणाणली.  ऑपरेशन सिंदुर आणि बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक आहेत.लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात आणि सभागृहात केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विपक्षाच्या दुटप्पी वर्तनावर टीका करत चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले. याचवेळी, उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव राजीनाम्याची घोषणा राज्यसभेत झाली.

लोकसभेतील गोंधळ

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी च्या खासदारांनी बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण आणि ऑपरेशन सिंदूर च्या मुद्यावरून संसद परिसरात आणि लोकसभेत तीव्र विरोध दर्शवला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला. यामुळे लोकसभेची कार्यवाही वारंवार खंडित झाली.

Parliament Adjourned
Parliamentary Adjournment : संसदेचे कामकाज २ डिसेंबरपर्यंत तहकूब

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “विरोधी आघाडी चर्चेची मागणी करत आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. मग ते सभागृह का चालू देत नाहीत? हा दुटप्पीपणा चुकीचा आहे. हंगामा करून जनतेच्या पैशाची नासाडी करू नये.” सरकारने सर्व मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Parliament Adjourned
Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

दुसरीकडे, सरकारने लोकसभेत सांगितले की, चालू आर्थिक वर्षात जून २०२५ पर्यंत सीमा शुल्क अधिकारी आणि राजस्व गुप्तचर संचालनालयाने बाजारात अवैध तंबाकूच्या विक्रीला आळा घालण्यासाठी सुमारे ३.९३ कोटी सिगारेट जप्त केल्या आहेत. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी ही माहिती लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.

राज्यसभेतील घडामोडी

राज्यसभेतही मंगळवारी गोंधळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, उपराष्ट्रपति आणि राज्यसभेचे सभापति जगदीप धनखड़ यांच्या राजीनाम्याची घोषणा याच दिवशी झाली. धनखड़ यांनी सोमवारी रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला होता. त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला, अशी माहिती गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या अधिसूचनेत दिली.

यानंतर, राज्यसभेच्या उपसभापती हरिवंश यांनी मंगळवारी सकाळच्या सत्रात सभागृहाच्या कार्यवाहीचे अध्यक्षपद सांभाळले. दुपारी १२ वाजता सभागृहाची बैठक सुरू झाल्यावर पीठासीन अधिकारी घनश्याम तिवारी यांनी धनखड़ यांच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला दिली.

विरोधी खासदारांनी बिहारमधील मतदार  यादीच्या पुनर्निरीक्षणाव्यतिरिक्त इतरही अनेक मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली. त्यांच्या निदर्शनांमुळे आणि नारेबाजीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे संसदेच्या कार्यवाहीला वारंवार खंड पडला आणि अखेरीस ती स्थगित करावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com