Parliamentary Adjournment : संसदेचे कामकाज २ डिसेंबरपर्यंत तहकूब

Adani Controversy and Sambhal Violence : अदानी, संभळ या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे सलग पाचव्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज २ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले.
Parliament
ParliamentAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : अदानी, संभळ या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे सलग पाचव्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज २ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले.

Parliament
Narendra Modi : विकसित महाराष्ट्राचा शेतकरी सर्वांत मजबूत स्तंभ : मोदी

अदानी वाद आणि उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी केलेल्या जोरदार निदर्शनामुळे लोकसभेचे कामकाज शुक्रवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.

Parliament
PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

त्यानंतर पुन्हा सभागृहाची बैठक सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सभागृहात गदारोळ झाला अन् कामकाज पुन्हा दिवसभरासाठी थांबवण्यात आले.

लोकसभेत विविध विषयांवर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळल्या, तर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नियम २६७ अन्वये विविध विरोधी पक्षांच्या सर्व १६ नोटिसा फेटाळल्या. दरम्यानच्या काळात, मुदत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com