Water Dam Stock : रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

Water Update : यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे पाण्याची टंचाई गेल्या वर्षीपेक्षा अधिक त्रासदायक झाली आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघू अशा एकूण ४९ धरणांमध्ये सध्या २१६.६३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Ratnagiri News : यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्यामुळे पाण्याची टंचाई गेल्या वर्षीपेक्षा अधिक त्रासदायक झाली आहे. जिल्ह्यातील तीन मध्यम आणि ४६ लघू अशा एकूण ४९ धरणांमध्ये सध्या २१६.६३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणात ४३.६७ टक्के साठा आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात ०.७२८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे ऐन पाणीटंचाईत थोडासा दिलासा मिळेल, अशी आशा आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस, कमालीची वाढलेली उष्णता यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जिल्ह्यातील मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. खेड तालुक्यातील नातूवाडी, संगमेश्वर तालुक्यातील गडनदी आणि राजापूर तालुक्यातील अर्जुना या तीन मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १८२.६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता.

Water Stock
Dam Water Stock : रायगडमध्ये २४ धरणांनी गाठला तळ

शुक्रवारपर्यंत या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने ५ टक्क्यांनी घट झाली आहे. या तीनही मध्यम धरणांमध्ये मिळून एकूण ११७.९५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६४.५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १०८.७१६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील ४६ लघू प्रकल्पांमध्ये घट झाली आहे.

या सर्व धरणांमधील एकूण २३०.५५८ दशलक्ष घनमीटरपैकी आता केवळ १०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी ४७.१५ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यंदा ४६ लघू प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्यात सुमारे चार टक्के घट झाली आहे.

Water Stock
Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

दरम्यान, रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची संचय पातळी १२.३०० दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३.३४० दशलक्ष घनमीटर आहे. यापैकी सध्याची पाणीपातळी १११ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठा ०.७२८ दशलक्ष घनमीटर आहे. म्हणजेच या धरणात २१.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर)

नातूवाडी : ५१.८१ (६०.१५ टक्के)

गडनदी : ८.३९ (३०.८१ टक्के)

अर्जुना : ५७.१४ (७९.५८ टक्के)

एकूण : ११७.९५ (६४.५६ टक्के)

गतवर्षीपेक्षा घट : पाच टक्के

एकूण ४६ लघू प्रकल्प : १००.६८८ (४३.६७ टक्के)

गतवर्षीपेक्षा घट : चार टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com