Crop Loan : नांदेड जिल्ह्यात खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ३९ टक्केच पीककर्ज वाटप

Kharif Crop Loan : नांदेड जिल्हा बँकेने मात्र १११ टक्के पीककर्ज वाटप करुन आघाडी घेतली आहे. तर ग्रामीण बँकने ९७ पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ साठी १८१२ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने बँकांना दिले होते. असे असताना जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ३९ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने मात्र १११ टक्के पीककर्ज वाटप करुन आघाडी घेतली आहे. तर ग्रामीण बँकने ९७ पीककर्ज वाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली.

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आगामी खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी १८१२.१४ कोटी, तर रब्बीसाठी ६३७.८६ कोटी असे एकूण दोन हजार ४५० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे. या बाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत. पीककर्ज

Crop Loan
Kharif Crop Loan : खरिपात २ हजार ९३३ कोटींचे पीककर्ज वितरण

वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके यांनी सर्वच बँकर्सना वेळोवेळी सूचना दिल्या. परंतु राष्ट्रीयीकृत बँका तसेच खासगी क्षेत्रातील बँकांनी अद्याप पीककर्ज वाटपाला गती दिली नाही. राष्ट्रीयीकृत बँकांनी ता. ३० सप्टेंबरपर्यंत ३९ टक्क्यांनुसार ६६ हजार ३७६ खातेदारांना ५९४ कोटी १३ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून १११ टक्क्यांनुसार ५८ हजार ५०४ खातेदारांना ४५४

Crop Loan
Crop Loan : रब्बी हंगामात होणार ५०० कोटींचे कर्जवाटप

कोटी ३४ लाख, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९७ टक्क्यांनुसार ६० हजार ३६४ खातेदारांना ४९९ कोटी ४७ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात ६१.१८ टक्क्यांनुसार खरिपासाठी एकूण एक लाख ८५ हजार २४४ खातेदार शेतकऱ्यांना १५४७ कोटी ९४ लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली.

रब्बीसाठी पीककर्ज वाटप सुरू

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नांदेड जिल्ह्यात रब्बीसाठी ६३७.८६ कोटी पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. यानुसार रब्बी हंगामासाठी ता. एक ऑक्टोबरपासून पीककर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी बँकांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com