Crop Loan : रब्बी हंगामात होणार ५०० कोटींचे कर्जवाटप

Rabi Season : कर्जमुक्‍ती योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचे सात-बारा कोरे झाले आहेत. याशिवाय नियमित कर्जदारांची आता संख्यावाढ झाली; काही नवीन खातेदारांची देखील वाढ नोंदविली गेली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Amravati News : खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामाची लगबग वाढली आहे. त्यामुळे पीककर्जाकडे देखील शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यंदा रब्बी हंगामाकरिता ५०० कोटी रुपयांच्या कर्जाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

Rabi Season
Rabi Sowing : रब्बीची ४ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यातील बॅंकांना १५०० कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे टार्गेट देण्यात आले होते. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत बॅंकांनी १,२१,१३१ शेतकऱ्यांना ९४ टक्‍के म्हणजेच १४०५.६४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. कर्जमुक्‍ती योजनेत बहुतांश शेतकऱ्यांचे सात-बारा कोरे झाले आहेत. याशिवाय नियमित कर्जदारांची आता संख्यावाढ झाली; काही नवीन खातेदारांची देखील वाढ नोंदविली गेली आहे.

Rabi Season
Rabi Season : रब्बीची राज्यस्तरीय आढावा बैठक मंगळवारी पुण्यात

या साऱ्यांच्या परिणामी जिल्हा व राष्ट्रीयकृत बॅंकांचा कर्ज वितरणाचा टक्‍काही वाढला. विशेष म्हणजे यंदाच्या खरिपात देखील कर्ज वितरणात जिल्हा बॅंकेने आघाडी घेतली होती. तब्बल ५७९ कोटी रुपयांचे कर्ज या बॅंकेने वितरित केले. आता रब्बी हंगाम तोंडावर असून यावेळी ५०० कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे टार्गेट आहे.

जिल्हा बॅंक अपवादात्मक स्थितीतच रब्बी हंगामात कर्ज देते. त्यासोबतच राष्ट्रीयीकृत बॅंका देखील हात आखडता घेतात. त्यामुळे रब्बी हंगामात उद्दिष्टाच्या केवळ ५० टक्‍केच कर्ज वितरण होते, असा आजवरचा अनुभव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com