Rabi Sowing : धाराशिव जिल्ह्यात यंदा केवळ १० टक्केच पेरणी

Rabi Season : यंदाच्या रब्बी हंगामात केवळ १० टक्केच पेरणी झाली आहे. दरम्यान थंडीची चाहूल लागल्याने यंदाचा रब्बी हंगाम वाया गेल्याचे चित्र दिसत आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात केवळ १० टक्केच पेरणी झाली आहे. दरम्यान थंडीची चाहूल लागल्याने यंदाचा रब्बी हंगाम वाया गेल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सुमारे चार लाख ११ हजार १७० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होत असते. जिल्ह्याही रब्बीचा म्हणून ओळखला जातो. हरभऱ्यासह ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यात एक लाख ८१ हजार ४२७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या ज्वारीची पेरणी होते.

यापैकी १९९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. म्हणजेच केवळ ११ टक्के ज्वारीची पेरणी झाली आहे. याशिवाय जिल्ह्यात एक लाख ८० हजार ९६० हेक्टर एवढे हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र आहे.

यामध्ये सध्या जिल्ह्यात केवळ १८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्राच्या केवळ ९.९४ टक्के म्हणजेच ४०८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात रब्बीचा हंगाम पूर्णपणे संकटात असल्याचे चित्र आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी केवळ ४९ टक्के

पेरणीचे क्षेत्रही वाया जाणार

जिल्हात सध्या जेव्हडी पेरणी झाली आहे. त्यातही कमी ओलाव्याला पेरणी झाली आहे. तर काही शेतकऱ्यांनी शेतात पाणी सोडून पेरणी केली आहे. त्यामुळे सरासरीच्या निम्मेही उत्पान्न मिळण्याची आशा नाही. परिणामी काही शेतकरी दुबार पेरणी नको, म्हणून पेरणी करण्याच्या स्थितीत नाहीत. जमिनीत अपेक्षित ओलावा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीकडे पाठ फिरविली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : रब्बी ज्वारीची ८ हजार ९७५ हेक्टरवर पेरणी

चाऱ्यासह पाण्याची चंटाई भेडसावणार

जिल्ह्यात पशुधनाची संख्याही पाच लाखांच्या जवळपास आहे. दरवर्षी हरभऱ्याच्या काडापासून जनावरांना चारा मिळतो. शेतकरी त्याचे संकलन करून ठेवतात. उन्हाळ्यामध्ये याचा पुरेसा वापर केला जातो.

शिवाय ज्वारीचा कडबाही चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे यंदाच्या वर्षात चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचे संकेत आहेत. एकूणच यंदाच्या रब्बी हंगाम संकटात सापडल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडणार असल्याचे चित्र आहे.

सरासरीच्या केवळ १० टक्केही पेरणी झालेली नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात रब्बी संकटात आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रावरीह काही उत्पन्न मिळेल की नाही, अशी स्थिती आहे.
- रवींद्र माने, अधिक्षक कृषी अधिकारी, धाराशिव.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com