Rabi Sowing : नांदेडात ७० हजार हेक्टरवर पेरणी

Rabi Season : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कृषी विभागाने चार लाख हेक्टरवर रब्बी हंगामात पेरणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार पेरणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७० हजार ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Nanded News : यंदाच्या वर्षी जिल्ह्यात कृषी विभागाने चार लाख हेक्टरवर रब्बी हंगामात पेरणी करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार पेरणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७० हजार ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यात सर्वाधिक ६५ हजार हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. आगामी काळात चार प्रकल्पातील पाणीपाळ्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार सिंचनाची सोय होणार असल्यामुळे यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Rabi Sowing
Rabi Sowing : खानदेशातील रब्बी पेरणी ३० टक्के पूर्ण

जिल्ह्यात यंदा पावसाळ्यातील पाच महिन्यात वार्षिक सरासरीच्या सरासरी ८८६ मिलीमीटरनुसार ९९.५१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

त्यामुळे काही तालुक्यात रब्बीची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मानार आणि विष्णुपुरी या दोन मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा समाधानकारक आहे. तसेच जिल्ह्यातील मध्यम तसेच लघू प्रकल्पातही पाणीसाठा बऱ्यापैकी आहे. या सोबतच जिल्ह्यालगत असलेल्या येलदरी, इसापूर (पैनगंगा) प्रकल्पात यंदा पाणीसाठा बऱ्यापैकी झाला असल्यामुळे हिवाळ्यात पाणीपाळ्याचे नियोजन नांदेड पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात रब्बीच्या पेरणीला वेग येणार आहे.

Rabi Sowing
Amit Shah : सेंद्रिय शेतमालाची जगभरात 'भारत ऑरगॅनिक्स' ब्रँडच्या नावाखाली होणार विक्री

चार लाख हेक्टर प्रस्तावित

जिल्ह्यात यंदाच्या वर्षी चार लाख हेक्टर क्षेत्र रब्बीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, रब्बी मका, हरभरा, करडई, रब्बी तीळ, रब्बी सूर्यफूल, जवस, मोहरी या पिकांचा समावेश आहे. आजपर्यंत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ३१.३० टक्के नुसार ७० हजार ३१३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक ६४ हजार ४९४ हेक्टरवर हरभरा, तीन हजार ४२० हेक्टरवर रब्बी ज्वारी, एक हजार ६४८ हेक्टरवर गहू, दोनशे हेक्टरवर मका, ५०३ हेक्टरवर करडई या पिकांची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील रब्बी हंगामाची आकडेवारी

पिके प्रस्तावित क्षेत्र (हेक्टरमध्ये) पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

रब्बी ज्वारी ३० हजार तीन हजार ४२०

गहू ४४ हजार एक हजार ६४८

हरभरा तीन लाख दहा हजार ६४ हजार ४९४

करडई सहा हजार ५०३

रब्बी मका नऊ हजार दोनशे

एकूण चार लाख ७० हजार ३१३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com