Alphonso Mango Crisis : अवकाळी पावसाचा हापूस हंगामावर घाला

Mango Production : अवकाळी पाऊस आणि अति उष्मा यांचा अनिष्ट परिणाम पिकावर झाल्यामुळे आंबा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Mangos
MangosAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : जिल्ह्यात यंदाही हापूस आंब्याच्या हंगामाला अवकाळी पावसाचा फटका बसला. हापूसचे फक्त ३० टक्केच उत्पादन हाती आले आहे. अवकाळी पाऊस आणि अति उष्मा यांचा अनिष्ट परिणाम पिकावर झाल्यामुळे आंबा उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे.

मुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी याची गंभीर दखल घेऊन उत्पादकांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांनी केली.

शासकीय विश्रमगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. या वेळी मनीष बांदीवडेकर, दीपक उपळे, अल्ताप काझी, इम्रान पावसकर आदी उपस्थित होते. सावंत म्हणाले, की आंब्यावरील रोगवर नियंत्रणात आणण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून संशोधनाबाबत फक्त पोकळ आश्वासने दिली जात आहेत.

आंबा-काजू बोर्ड स्थापन झाला एवढेच माहीत आहे, पीकविमा योजनेचा काही फायदा नाही, बॅंकांकडून पतपुरवठ्याबाबतही शिथिलता नाही, अशा अनेक प्रश्नांनी आंबा बागायतदार ग्रासला गेला आहे. गेली अनेक वर्षे आम्ही निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडलो आहोत. सलग तीन वर्षे आंबा उत्पादन ३० टक्क्यांच्या वर झालेले नाही.

Mangos
Gavran Mango : गावरान आंब्याचे संवर्धन होणार

फवारणीवर होणारा खर्च, वाढलेली मजुरी आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मेळ बसत नसल्याने आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत आहेत. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी गेली चार ते पाच वर्षे आम्ही संघर्ष करत आहोत. साखळी उपोषण केले, मंत्र्यांबरोबर १३ बैठका झाल्या, परंतु अद्याप बागायतदारांना न्याय मिळालेला नाही.

Mangos
Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत व्यवस्थापनावर भर

ते म्हणाले, की थ्रिप्स, फळमाशी आदींच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले. कोकण कृषी विद्यापीठ यावर संशोधन करत आहे. त्याची माहिती घेतली असता अद्याप संशोधन सुरू आहे, एवढेच उत्तर मिळते.

पीकविम्याची रक्कम भरूनदेखील भरलेल्या रकमेपेक्षा ५० टक्के देखील विम्याची रक्कम मिळत नाही. आंबा आणि काजू बोर्ड स्थापन झाल्याचे सांगितले गेले. यावर दोन बागायतदारांचे सदस्यदेखील देण्यात आले. परंतु या बोर्डाचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com