
Nagpur News : चव आणि रंगाच्या बाबतीत वेगळेपण जपणाऱ्या गावरान आंब्याचे संवर्धन व्हावे याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत बुधवारी (ता. २१) गडचिरोली कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर, पडिक जमिनीवर जुनी आंब्याची झाडे आहेत. त्यांच्या चवीमध्ये, सुगंधामध्ये, रंगामध्ये, आकारामध्ये, फळधारणेमध्ये विविधता दिसून येते. तसेच प्रत्येक गावांमध्ये रसासाठी, लोणच्यासाठी, कच्चा-कापून खाण्यासाठी, सलाडसाठी असे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माचे आंबे दिसून येतात.
बाजारभावाच्या दुष्टिने विकसित वाणापेक्षा या आंब्यांच्या फळांना जास्त बाजारभाव मिळतो आणि लोकांची पसंतीही अधिक आहे. अशा बहुमूल्य गावरान आंब्याचा दिवसेंदिवस ऱ्हास होत आहे. त्यामुळे या आंब्याचे वाण जतन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली येथे २१ मे रोजी पूर्व विदर्भातील गावरानी आंब्याचे प्रदर्शन आयोजित केली आहे.
विदर्भातील ज्या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेल्या आब्यांच्या नमुन्याचे प्रत्येकी १० फळे कृषी विभागाने क्षेत्रीय कर्मचारी यंत्रणेमार्फत गोळा करून तसेच शेतकऱ्यांनी स्वतःही मंगळवार (ता. २०) पर्यंत गडचिरोली येथे प्रदर्शनात त्यांच्याकडील वैशिष्ट्यपूर्ण गावरान आंबे ठेवावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रदर्शनात सहभागींना प्रमाणपत्रासह बक्षिसाचेही वितरण करण्यात येणार आहे.
कलमा शेतकऱ्यांना होणार उपलब्ध
गावरान आंबा प्रदर्शनामध्ये प्रत्येक तालुकास्तरावरील कृषी विभागातील यंत्रणेने तसेच शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडील अशी वैशिष्ट्यपूर्ण गावरान आंबे प्रदर्शनात करावे. यांचा कृषी महाविद्यालयाकडून अभ्यास करत त्यातील चांगले स्थानिक वाण निवडून त्याची विद्यापीठाच्या नागपूर, गडचिरोली, सिधेवायी या प्र-क्षेत्रावर लागवड करण्यात येईल. त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कलमांचे शेतकऱ्यांनाच लागवड करण्यासाठी उपलब्ध करून देत या माध्यमातूह या गावरान आंब्याच्या वाणाचे जतन करण्यात येणार असल्याचे डॉ. पंचभाई यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.