Sangli Kharif Sowing : सांगलीत खरीप पिकांची ८५ हजार हेक्टरवर पेरणी

Kharif Season 2025 : जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ३ हजार ७७९ हेक्टरवर पेरा झाला होता. गेल्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतली आहे. वाफसा आल्याने पूर्वमशागतीची कामे पूर्ण केली आहेत.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात ८४ हजार ८३६ हेक्टरवर म्हणजे ३४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पेरा झाला आहे. मात्र, शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने भात पिकांच्या पेरण्या रखडल्या असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मेच्या मध्यापासून सर्वदूर पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या होत्या. बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीही उरकल्या होत्या. परंतु सतत पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले होते. वाफसा नसल्याने पेरण्याही थांबल्या होत्या. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हजार हेक्टर आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ३ हजार ७७९ हेक्टरवर पेरा झाला होता. गेल्या आठवड्यापासून पावसाने उसंत घेतली आहे. वाफसा आल्याने पूर्वमशागतीची कामे पूर्ण केली आहेत.

Kharif Sowing
Kharif Sowing : माॅन्सूनच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात

गेल्या आठ दिवसांपासून पेरणीला गती आली आहे. दहा दिवसांत ८१ हजार हेक्टवर पेरा झाला आहे. खानापूर तालुक्यात सर्वांत कमी पेरा झाला आहे. त्याखालोखाल तासगाव तालुक्यात पेरणी झाली आहे. जत तालुक्याचे सरासरी क्षेत्र ६९,६५७ हेक्टर आहे. तालुक्यात पेरणीयुक्त पाऊस झाला. तालुक्यात ज्वारी, बाजरी, मका, तूर आणि मूग या पिकांचा एकूण ५२,४५५ हेक्टरवर पेरा झाला आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पावसाच्या भरवशावर पेरण्या केलेल्यांचे डोळे आकाशाकडे

शिराळा तालुक्यात पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. चरण, वारणावती, आरळा, या भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भात पेरणी रखडली आहे. तालुक्याचे भाताचे सरासरी क्षेत्र ११५०० हेक्टर इतके असून २३३५ हेक्टरवर पेरा झाला आहे.

तालुकानिहाय खरीप हंगामातील पेरणी दृष्टीक्षेप

तालुका क्षेत्र (हेक्टर)

मिरज ४,६६५

जत ५२,४५५

खानापूर २२६

वाळवा ५,६२३

तासगाव १,०५१

शिराळा ४,२९३

आटपाडी १,३२६

कवठेमहांकाळ ११,६४१

पलूस १,४४५

कडेगाव २,१११

एकूण ८४,८३६

पीक क्षेत्र (हेक्टर)

भात २,७०२

बाजरी ३०,१२६

मका १७,१६१

सोयाबीन ८,८६५

तूर ७,१९०

उडीद ८,२७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com